• Download App
    Gadkari's advice to farmers after coming to Vidarbha

    विदर्भात येऊन गडकरींचा शेतकऱ्यांना ‘परखड’ सल्ला; सरकारच्या भरवशावर फार राहू नका!

    प्रतिनिधी

    नागपूर :  केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या सर्वोच्च संसदीय मंडळातून आपले स्थान गमावलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या “परखड” वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. आज असेच एक “परखड” वक्तव्य त्यांनी विदर्भात येऊन शेतकऱ्यांसमोर केले आहे. Gadkari’s advice to farmers after coming to Vidarbha

    केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना लागू केली आहे. अशीच योजना आता महाराष्ट्र देखील मुख्यमंत्री किसान सन्मान योजना या नावाने लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी मात्र शेतकऱ्यांना सरकारच्या भरवशावर न राहण्याचा सल्ला दिला आहे. नागपुरात ऍग्रो व्हिजन फाउंडेशनच्या कार्यक्रमात त्यांनी भाजीपाला आणि फळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोलाचे सल्ले दिले आहेत.

     नितीन गडकरी म्हणाले :

    • माझं मार्केट मी शोधलं आहे, तुमचं मार्केट तुम्ही शोधा. शेतकऱ्यांनी सरकारवर फारसं अवलंबून राहू नये, मी स्वतः सरकारमध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगतोय.
    • आपल्याकडे लोकांचा विश्वास सरकार आणि परमेश्वरावर खूप असतो. मात्र, लग्न झाल्यानंतर नवविवाहितांनी प्रयत्न केले नाहीत आणि परमेश्वर आणि सरकारने कितीही इच्छा व्यक्त केली तरी घरी पाळणा हलणार नाही, तसेच शेतकऱ्याने स्वतःचे प्रयत्न केले नाहीत तर त्याची प्रगती होणार नाही.
    • सरकारच्या फार भरवशावर राहू नका, मी सरकारमध्ये आहे म्हणून सांगतो. कृषी क्षेत्रात विकास करायचा असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. सरकारच्या भरवशावर न राहता स्वतः कृती करायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी प्रगती केली आहे, अशा शेतकऱ्यांचा आदर्श घ्या.

    Gadkari’s advice to farmers after coming to Vidarbha

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र