• Download App
    मानवाधिकार भंगावरून चीनवर टीका, मात्र कारवाई करण्याचे धाडस नाही।G – 7 countries targets China on human rights issue

    मानवाधिकार भंगावरून चीनवर टीका, मात्र कारवाई करण्याचे धाडस नाही

    वृत्तसंस्था

    लंडन : चीनमधील उइगर मुस्लिमांवर होत असलेल्या मानवाधिकार भंगाच्या घटनांवरून जी-७ देशांच्या गटाने आज चीनवर जोरदार टीका केली. मात्र, अधिकाधिक सामर्थ्यशाली होत असलेल्या चीनविरोधात ठोस कारवाई करण्याचा निर्णय मात्र घेतला गेला नाही. G – 7 countries targets China on human rights issue

    लंडन येथे सध्या जी-७ गटाच्या पररष्ट्र मंत्र्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीमध्ये चीनमधील शिनजिआंग प्रांतातील उइगर मुस्लिमांसह इतर अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचारांवर चर्चा करण्यात आली.



    या समुदायाला बळजबरीने सरकारला हवे ते शिक्षण देणे, काम करवून घेणे, त्यांची लोकसंख्या कमी करण्यासाठी बळजबरीने नसबंदी करणे असे प्रकार होत असल्याबाबत अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. याबाबत ‘जी-७’ परिषदेत आज चिंता व्यक्त करण्यात आली.

    चीनवर टीका करण्यात आली असली तरी या गटातील ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपान या बड्या देशांनी चीनविरोधात एकत्र कारवाई करण्याचा निर्णय घेण्याऐवजी आपापल्या पातळ्यांवर जनजागृती करणे, चीनविरोधात कायदे करणे असे उपाय योजण्याचा निर्णय घेतला. ठोस कारवाई करण्याचा अमेरिकेचा विचार असला तरी ‘जी-७’ गटातील काही देशांनी चीनशी व्यापारी संबंध बिघडू नये म्हणून सावध भूमिका घेतली.

    G – 7 countries targets China on human rights issue

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले