वृत्तसंस्था
लंडन : श्रीमंत देशांची संघटना असलेला ‘जी-७’ गट जगाला कोरोना प्रतिबंधक लशींचे एक अब्ज डोस पुरविणार आहे, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी आज सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी कालच जगाला ५० कोटी डोस देण्याचे जाहीर केले होते. हे डोस धरून एकूण एक अब्ज डोस जी-७ देशांनी देण्याचे नियोजन आहे. G – 7 countries provide 1 billion doses
फ्रान्सनेही जगाला या वर्षाअखेरीपर्यंत ३० लाख डोस देण्याचे मान्य केले आहे. जगभरात लशींची कमतरता असल्याने अतिरिक्त लस जगाला देण्यासाठी श्रीमंत देशांवर दबाव येत आहे. अमेरिकेत लशींचा प्रचंड साठा असून गेल्या काही आठवड्यांमध्ये त्यांच्याकडील मागणीही घटली आहे.
कोरोना संकटातून जगाला बाहेर काढण्यासाठी आम्ही पुढाकार घेण्याचे ठरविले आहे, असे जॉन्सन यांनी सांगितले. ब्रिटनकडून येत्या काही आठवड्यांमध्ये ५० लाख डोस संयुक्त राष्ट्रांच्या कोव्हॅक्स सुविधेला दिले जाणार असून उर्वरित डोस वर्षाच्या अखेरीपर्यंत दिले जातील. जी-७ गटातील इतर देशही या अभियानात सहभाग घेतील, अशी आशा जॉन्सन यांनी व्यक्त केली.
G – 7 countries provide 1 billion doses
महत्त्वाच्या बातम्या