• Download App
    हुंडाईच्या पाकिस्तानी शाखेची मस्ती, स्वतंत्र काश्मीरचा पुरस्कार!! #Boycott hudai ट्रेंडनंतर हुंडाईच्या भारत शाखेकडून पाकिस्तानी शाखेचा निषेध!! । Fun of Hyundai's Pakistani branch, award of independent Kashmir !! Hyundai's India branch protests Pakistani branch after #Boycott hudai trend !!

    हुंडाईच्या पाकिस्तानी शाखेची मस्ती, स्वतंत्र काश्मीरचा पुरस्कार!! #Boycott hudai ट्रेंडनंतर हुंडाईच्या भारत शाखेकडून पाकिस्तानी शाखेचा निषेध!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या हुंडाई कंपनी विरोधात सध्या सोशल मीडियातून #Boycott Hyundai’ हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. हा हॅशटॅग ट्रेंड झाल्याबरोबर हुंडाई कंपनीचे धाबे दणाणले असून भारताच्या हुंडाई शाखेने आपल्याच कंपनीच्या पाकिस्तानी शाखेचा निषेध केला आहे. Fun of Hyundai’s Pakistani branch, award of independent Kashmir !! Hyundai’s India branch protests Pakistani branch after #Boycott hudai trend !!

    ५ फेब्रुवारीला पाकिस्तान कथित काश्मीर एकता दिवस म्हणून साजरा करत असताना हुंडाईच्या पाकिस्तानच्या शाखेने कुरघोडी करत एक पोस्ट व्हायरल करत काश्मीरला स्वातंत्र्य मिळावे, अशी मनोकामना केली. यामुळे भारतात हुंडाईच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

    हुंडाई या कंपनीच्या ट्विटमध्ये ‘काश्मीर बंधू ज्यांनी काश्मीरसाठी प्राण दिले त्यांची आठवण काढूया आणि ते ज्या स्वतंत्र काश्मीरसाठी सतत झगडत आहेत, त्यांच्या पाठीशी उभे राहुया’, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्या ट्विटमध्ये काश्मीर या शब्दाच्या भोवती तारेचे कुंपण दाखवण्यात आले आहे. या प्रकारचे ट्विट सोशल मीडियात व्हायरल होताच जनक्षोभ उसळला आहे. आणि #Boycott Hyundai हा ट्रेंड सुरु झाला आहे. हजारो भारतीय आता हुंडाई कंपनीने माफी मागावी अशी मागणी करत आहेत.



    प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनी काश्मिरातील दहशतवाद्यांना पाठिंबा देणे निंदनीय आहे. मी भारत सरकारला आवाहन करत आहे की, या प्रकरणी कडक करावी कारवाई करावी.

    अंशुल सक्सेना यांनी ट्विट करत, आशा आहे की, हुंडाईला या विषयाचे गांभीर्य समजले असेल. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे या प्रकरणी हुंडाईने माफी मागावी. तसेच येणाऱ्या महिन्यात हुंडाई कंपनीने त्यांच्या गाड्यांचा विक्री दर घसरणार आहे, यासाठी तयार राहावे.

    हासी जोहरी यांनी ट्विट करत, हुंदाई कंपनीचे हे ट्विट निषेधार्ह आहे. जर तुम्ही भारताला हुंडाईचे दुसरे घर समजता, मग भारताविषयी असे द्वेषपूर्ण ट्विट का करता? जर तुमचे भारतावर प्रेम असेल तर त्वरित माफी मागा, जर असे केले नाही तर कुणीही हुंडाई कंपनीची गाडी खरेदी करणार नाही.

    हुंडाईसाठी भारत हे दुसरे घर आहे. आम्ही घडल्या प्रकाराविषयी अजिबात सहमत नाही. आम्ही याचा जाहीर निषेध करतो, असे ट्विट करून हुंडाईच्या भारत शाखेने केले आहे.

    Fun of Hyundai’s Pakistani branch, award of independent Kashmir !! Hyundai’s India branch protests Pakistani branch after #Boycott hudai trend !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!