नरेंद्र मोदी यांनी छोट्या, गरीब देशांसोबत केलेली कोरोना लस डिप्लोमसी वेगळ्या प्रकारे फळ देऊ लागली आहे. कॅरेबियन बेटं, डॉमिनिक रिपब्लिक सारख्या अनेक देशांना मोदी यांनी कोरोना लस पुरवली. यातून भारताबद्दल गुडविल तयार झाले. त्यामुळेच अँटिग्वाचे नागरिकत्व घेतल्यानंतरही मेहुल चोक्सी या फरार घोटाळेबाजाला भारताकडे सुपूर्त करण्याचा निर्णय डॉमिनिक सरकारने घेतला आहे. Fugitive Mehul Choksi To Be Deported To India, Dominica Government Tells Court : Mehul Choksi’s London Lawyers argued about new Citizenship but court dismissed all; PM Narendra Modi’s Vaccine Diplomacy has paid
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : क्युबाला पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या मेहुल चोक्सीला काही तासांपुर्वीच डॉमिनिकच्या किनाऱ्यावर नाट्यमय घडामोडींमध्ये पकडण्यात आले.
त्यानंतर चोक्सीने लंडन येथून उभी केलेली वकिलांची फौज त्याला डॉमिनिकमधून सोडवण्यासाठी दाखल झाली. मात्र या टीमच्या युक्तीवादाला डॉमिनिक कोर्टाने केराची टोपली दाखवली.
उलट डॉमिनिक सरकारने बुधवारी (दि. 2) त्यांच्या न्यायालयात युक्तिवाद केला की, पंजाब नॅशनल बॅंकेतील 14 हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यातील प्रमुख आरोपी फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला भारतात हाकलून द्यावे.
डॉमिनिकच्या सरकारी वकीलांनी न्यायालयाला सांगितले की 62 वर्षीय चोक्सीने दाखल केलेली याचिका ऐकून घेण्यात येऊ नये. चोक्सीला लवकरात लवकर भारताच्या हवाली करावे असा दबाव भारत सरकार टाकत आहे. दरम्यान, या खटल्यात गुरुवारी आणखी सुनावणी होणार आहे.
गेल्या आठवड्यात डॉमिनिकात पकडलेला चोक्सी व्हिडीओ-कॉन्फरन्सच्या माध्यमातून खटल्यात भाग घेत आहे. त्याच्या शरीराला इजा झाली असून ते रुग्णालयात उपचार घेत असल्याचे त्याच्या वकीलांनी सांगितले.
चोक्सीच्या वकिलांनी सांगितले की, चोक्सीला अपहरण करुन डॉमिनिकात आणले गेले. कोर्टाने हे म्हणणे ग्राह्य धरल्यास गुरुवारी कदाचित चोक्सीला अँटिगा या कॅरेबियन बेटावर परत पाठवण्यात येईल. भारतातून फरार झाल्यावर चोक्सीने अँटिगाचे नागरिकत्त्व मिळवले आहे.
मात्र अँटिगाने चोक्सीने परस्पर डॉमिनिकातून थेट भारतात जावे असे चोक्सीला सुनावले आहे. अँटिगाच्या पंतप्रधानांनी गेल्याच आठवड्यात नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या लसींबद्दल भारताचे जाहीर आभार मानले होते हे विशेष.
दरम्यान, चोक्सीभोवतीचा फास आवळण्यासाठी भारताची केंद्रीय अन्वेषण ब्युरो आणि अंमलबजावणी संचालनालय यांची आठ सदस्यांची टीम डॉमिनिका येथे तळ ठोकून आहे. त्यांच्या मदतीसाठी भारत सरकारने त्रिनिदाद व टोबॅगो येथूनही आपले उच्चायुक्त तिथे पाठविले आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, खोट्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे मेहुल चोकसीने अँटिगाचे नागरिकत्व मिळवले असा दावा भारताने केला आहे. तर मेहुल चोक्सीच्या वकीलांच्या टीमने असा युक्तीवाद केला की,
नव्या देशाचे नागरिकत्व मिळवल्यानंतर चोक्सीला भारतीय संविधानाच्या आधारे पकडता येणार नाही. कोणत्याही कारणांमुळे कोणत्याही भारतीयाने परदेशी नागरिकत्त्वासाठी अर्ज केल्यास त्याचे भारताचे नागरिकत्त्व आपोआप रद्द होईल,
या घटनेतील तरतुदीचा आधार चोक्सीचे वकील घेत आहेत. चोक्सीसोबत फरार झालेला घोटाळेबाज हिरे व्यापारी नीरव मोदी चोक्सीच्या सुटकेसाठी प्रयत्न करतो आहे. या दोघांनी 2018 मध्ये भारतातून पलायन केले. नंतर पंजाब बँकेचा घोटाळा उघडकीस येण्यापुर्वी दोन महिने आधी मेहुल चोक्सीने अँटिगाचे नागरिकत्त्व घेतले, असे सांगितले जाते.
Fugitive Mehul Choksi To Be Deported To India, Dominica Government Tells Court : Mehul Choksi’s London Lawyers argued about new Citizenship but court dismissed all; PM Narendra Modi’s Vaccine Diplomacy has paid