वृत्तसंस्था
दावोस : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक नीतीचे टीकाकार आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील झालेच, पण आता त्यापुढे जाऊन त्यांनी दावस मधल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावरून राहुल गांधींवर फार मोठी स्तुतीसुमने उधळली आहे. राहुल गांधी हे पप्पू नाहीत तर स्मार्ट तरुण नेते आहेत, अशा शब्दांत रघुराम राजन यांनी त्यांची स्तुती केली आहे. त्याचवेळी आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचा खुलासा देखील राजन यांनी केला आहे. From Raghuram Rajan on Rahul Gandhi in the World Economic Four
राहुल गांधींच्या पप्पू प्रतिमेविषयी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये बोलताना रघुराम राजन म्हणाले, की त्यांची पप्पू इमेज भारतात पुसली गेली आहे. ते पप्पू नव्हेत तर स्मार्ट तरुण नेते आहेत. त्यांना आर्थिक बाबी समजून घेण्याची जिज्ञासा आहे. ते जोखीम, जबाबदारी आणि मूल्यांकन यांचा चांगल्या समन्वय साधू शकतात, असे माझे निरीक्षण आहे.
रघुराम राजन यांचे केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारशी कधीच पटले नव्हते. मोदींच्या पंतप्रधान पदाच्या पहिल्या कारकिर्दीत ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. पण मोदी सरकारने त्यांना मुदतवाढ दिली नव्हती. त्यानंतर ते आपल्या शैक्षणिक क्षेत्रात अमेरिकेत परत गेले. परंतु मोदी सरकारवर त्यांची टीकेची धार कायम होती.
केंद्रातील मोदी सरकारने जेव्हा मेक इन इंडिया सारख्या महत्त्वाकांशी योजनेला चालना दिली तेव्हा भारताने चीनला मागे टाकणे फार अवघड आहे. भारताने मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात पडू नये. भारताला त्यापेक्षा सेवा क्षेत्रात अधिक वाव आणि संधी आहे, अशी वादग्रस्त वक्तव्य रघुराम राजन यांनी नेहमीच केली. त्यानंतर ते भारत जोडो यात्रेत सामील झाले होते. राहुल गांधी यांनी त्यांची एक मुलाखत त्याच दरम्यान घेतली होती. आता तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावरून रघुराम राजन यांनी राहुल गांधी हे पप्पू नव्हेत, तर स्मार्ट तरुण नेते आहेत, अशी त्यांच्या 52 व्या वर्षी स्तुती केली आहे.
From Raghuram Rajan on Rahul Gandhi in the World Economic Four
महत्वाच्या बातम्या