कोरोना प्रतिबंधक रशियन लस स्फुटनिक व्हीची दुसरी खेपही भारतात दाखल झाली आहे. पुढील आठवड्यापासून ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. या लसीची किंमत ९९५ रुपये आहे.From next week, the corona preventive Sputnik V vaccine in market, will produce 85 crore doses
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक रशियन लस स्फुटनिक व्हीची दुसरी खेपही भारतात दाखल झाली आहे. पुढील आठवड्यापासून ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. या लसीची किंमत ९९५ रुपये आहे.
कोरोनाच्या दुसºया लाटेत रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतीय बनावटीची कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लसींचा पुरवठा कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर रशियन स्फुटनिक व्ही लसीलाही भारतात परवानगी देण्यात आली आहे.
भारतातील रशियाचे राजदूत एन. कुदाशेव यांनी सांगितले की ही एक रशियन-भारतीय लस आहे. हळहळू भारतात या लसीचे उत्पादन वाढवून ८५ कोटी डोस प्रति वर्ष करण्यात येईल.
तसेच भारतात लवकरच सिंगल डोस लस स्पुटनिक लाईट ही लसही आणली जाणार आहे. भारतात लसीचं उत्पादन तेजीनं वाढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.रशियामध्ये जुलै २०२० पासून लोकांच्या लसीकरणासाठी याच लसीचा वापर करण्यात येत आहे.
ही लस तिच्या प्रभावीपणासाठी जगभरात ओळखली जाते. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या विरोधातही ही लस काम करणार असल्याचे रशियाच्या शास्त्रज्ञांनी सिध्द केल्याचे कुदाशेव यांनी सांगितले.
डॉ. रेड्डीज ही औषध निमार्ता कंपनी रशियाची ही लस भारतात बनविणार असून मेक इन इंडियाची ही लस आणखी स्वस्त मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या या लसीची किंमत ९९५ रुपये आहे.
From next week, the corona preventive Sputnik V vaccine in market, will produce 85 crore doses
महत्त्वाच्या बातम्या
- थरारक : एका स्पेअरपार्टमुळे बंद पडणार होता तळोजातील ऑक्सिजन प्लांट, 16 तास अधिकाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न, हवाई दलाने वेळेवर पोहोचवली मदत
- Corona Cases In India : देशातील कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट, २४ तासांत ४ हजारांहून जास्त मृत्यूंमुळे चिंता कायम
- Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दराचा पुन्हा भडका, अनेक शहरांत १०० रुपयांच्या पुढे!
- मराठवाड्याचे सुपुत्र काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं दु:खद निधन
- Cyclone Tauktae : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवर एनडीआरएफ सतर्क, अनेक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता