• Download App
    रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये आता नागरिकांसाठीही मोफत कोरोना चाचणी आणि उपचार|Free corona testing and treatment for citizens now in railway hospitals

    रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये आता नागरिकांसाठीही मोफत कोरोना चाचणी आणि उपचार

    कोरोना विरुध्दच्या लढाईत देशातील सर्व केंद्रीय मंत्रालयांनी एल्गार पुकारला आहे. आता रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांसाठीही मोफत कोरोना चाचणी होणार आहे. त्याचबरोबर रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या नागरिकांना मोफत जेवणही दिले जाणार आहे.Free corona testing and treatment for citizens now in railway hospitals


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना विरुध्दच्या लढाईत देशातील सर्व केंद्रीय मंत्रालयांनी एल्गार पुकारला आहे. आता रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये सामान्य गरिकांसाठीही मोफत कोरोना चाचणी होणार आहे.

    त्याचबरोबर रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या नागरिकांना मोफत जेवणही दिले जाणार आहे.देशातील अनेक शहरांमध्ये रेल्वेची रुग्णालये आहेत. याठिकाणी रेल्वेचे कर्मचारी वगळता सामान्य नागरिकांनाही उपचार मिळतात.



    परंतु, त्यांना त्यासाठी शुल्क मोजावे लागते. कोरोनाच्या महामारीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे.
    रेल्वे बोर्डाच्या बैठकीत कोरोना विरुध्दच्या लढाईत पूर्ण क्षमतेने उतरण्याचा निर्णय घेण्यात आला.

    रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये आता उपचाराच्या सुविधा वाढविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कोराना काळात ऑक्सिजनची कमतरता असल्याने जास्तीत जास्त ऑक्सिजन एक्सप्रेस चालविण्याचा निर्णयही घेण्यात आला. देशातील विविध शहरांना जोडणाऱ्या  रेल्वेची सेवाही चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

    Free corona testing and treatment for citizens now in railway hospitals

    महत्वाच्या  बातम्या

    Related posts

    Delhi Blast, : दिल्ली स्फोटप्रकरणी अतिरेकी उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक; ड्रोन-रॉकेट बनवले, तांत्रिक मदत पुरवली

    CJI BR Gavai : सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचे आरक्षणावर मोठे वक्तव्य, अनुसूचित जातींतही (SC)लागू व्हावे ‘क्रीमी लेयर’

    Nitish Kumar : नितीश कुमार 20 नोव्हेंबरला गांधी मैदानावर शपथ घेणार; BJP आणि JDU मध्ये प्रत्येकी 16 मंत्री