• Download App
    सरकारी रुग्णवाहिकांना दररोज ५० लिटर डिझेल मोफत, रिलायन्स कंपनीचा निर्णय Free 50 liters of diesel per day for government ambulances, Reliance decision

    सरकारी रुग्णवाहिकांना दररोज ५० लिटर डिझेल मोफत, रिलायन्स कंपनीचा निर्णय

    देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. गंभीर रुग्णांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे रुग्णवाहिका पुरत नाहीत. यासाठी रिलायन्स उद्योगसमुहाने मदतीचा हात पुढे केला आहे. सरकारी रुग्णवाहिकांना रिलायन्सच्या पेट्रोलपंपावर दररोज ५० लिटर डिझेल मोफत दिले जाणार आहे. Free 50 liters of diesel per day for government ambulances, Reliance decision


    प्रतिनिधी

    मुंबई: देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. गंभीर रुग्णांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे रुग्णवाहिका पुरत नाहीत. यासाठी रिलायन्स उद्योगसमुहाने मदतीचा हात पुढे केला आहे. सरकारी रुग्णवाहिकांना रिलायन्सच्या पेट्रोलपंपावर दररोज ५० लिटर डिझेल मोफत दिले जाणार आहे.

    कोरोनाविरुध्दच्या लढाईत रिलायन्स उद्योग समूह विविध प्रकारे मदत करत आहे. आता रिलायन्स समूह त्यांच्या मालकीच्या सर्व पेट्रोल पंपांवर रुग्णवाहिकांना ५० लीटर डिझेल मोफत देणार आहे. मोफत डिझेल घेणारी रुग्णवाहिका सरकारी असायला हवी. देशभरात रिलायन्सचे जवळपास १५०० पेट्रोल पंप आहेत. या सर्व पेट्रोल पंपवर ही सुविधा उपलब्ध असेल.



    गेल्या काही दिवसांत इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे कोरोना संकटात सुरू असलेल्या मदतकार्यात कोणतीही बाधा येऊ नये यासाठी रिलायन्सने हा निर्णय घेतला आहे.

    कोरोना संकटाचा सामना करताना केंद्र सरकार महत्त्वाची पावलं उचलत आहे. या महामारीशी दोन हात करण्यासाठी रुग्णवाहिकांना आम्ही डिझेल मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारी खर्च वाचेल. पैशांची बचत होईल,असा विश्वास रिलायन्सने व्यक्त केला आहे.

    Free 50 liters of diesel per day for government ambulances, Reliance decision

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका