वृत्तसंस्था
पणजी : ‘आयएनएस मार्मगोवा’ असे नाव असलेली युद्धनौका येत्या रविवारी, १८ डिसेंबर रोजी नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. गोवा मुक्ती दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम करण्यात येणार आहे. Fourth destroyer to boost Indian Navy’s strength; Will join the fleet
कोणती आहेत वैशिष्ट्ये?
विशेष म्हणजे या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र सज्ज केली जातात. या क्षेपणास्त्राची युद्धनौकेवरून मारा करणारी आवृत्ती सात वर्षांपूर्वी नौदलात दाखल करण्यात आली होती. सन २०१४पासून ताफ्यात दाखल करून घेतलेल्या ‘आयएनएस कोलकाता’ श्रेणीतील तीन विनाशिकांवर हे क्षेपणास्त्र आहे. तर वर्षभरापूर्वी ताफ्यात दाखल केलेली अत्याधुनिक ‘आयएनएस विशाखापट्टणम’ हीदेखील या क्षेपणास्त्राने सज्ज आहे.
आता रविवारी दाखल होणारी ‘मार्मुगाव’ ही याच श्रेणीतील युद्धनौका आहे. माझगाव डॉक कारखान्यात तयार झालेली ‘मार्मगोव’ची उभारणी ४ जून २०१५ रोजी सुरू झाली. १७ सप्टेंबर २०१६ रोजी या युद्धनौकेचे जलावतारण झाले. विस्तृत समुद्री चाचण्यांनंतर मागील महिन्यात ती नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. आता १८ डिसेंबरला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल करून घेतली जाणार आहे. नौदल गोदीत हा कार्यक्रम होईल
Fourth destroyer to boost Indian Navy’s strength; Will join the fleet
महत्वाच्या बातम्या
- वीर सावरकरांच्या जन्मस्थळ विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी; शिंदे – फडणवीस सरकारची मान्यता
- सातारा शिवतीर्थ परिसर विकासाला शिंदे – फडणवीस सरकारचा 8 कोटींचा निधी; खासदार उदयनराजेंकडून आभार
- मुंबईसह महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; सदानंद दाते एटीएस प्रमुख
- सुषमा अंधारेंची तत्काळ शिवसेनेतून हकालपट्टी करा; वारकऱ्यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी