वृत्तसंस्था
रांची : छत्तीसगडच्या नक्षल प्रभावित सुकमा जिल्ह्यातील नऊ महिला नक्षलवाद्यांसह ४३ नक्षलवाद्यांनी बुधवारी आत्मसमर्पण केले. सुकमा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सुनील शर्मा म्हणाले की, जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘पूना नर्कोम'(नवी सकाळ) अभियानांतर्गत नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
Forty-three Naxalites including a Naxalite commander and nine women surrendered in Chhattisgarh sukama district
ते म्हणाले, पूना नर्कोमा मोहिमेमुळे प्रभावित होऊन आणि स्थानिक आदिवासींवरील शोषण, अत्याचार, भेदभाव आणि हिंसाचाराला कंटाळून ४३ नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये मिलिशिया कमांडर पोडियामी लक्ष्मणदेखील आहे. याच्यावर सरकारने एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
सुनील शर्मा पुढे म्हणाले की, आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांपैकी काही नक्षलवादी मिलिशिया सदस्य, दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना, क्रांतिकारी महिला आदिवासी संघटना आणि चेतना नाट्य मंडळीचे सदस्य आहेत नक्षलवाद्यांपैकी १८ जण कुकनार पोलिस ठाणे आणि १९ गदिरास पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहेत.
याशिवाय, चार तोंगपाल ठाणे, एक फुलबागडी ठाणे आणि एक चिंतागुफा ठाणे परिसरातील रहिवासी आहेत. जिल्ह्यात सुरक्षा दल आणि जिल्हा प्रशासनाकडून नक्षल निर्मूलन मोहीम राबवली जात आहे. ज्या अंतर्गत सुकमाच्या अंतर्गत मोहिमेपर्यंत पोहचून जिल्हा प्रशासनाच्या पुनर्वसन धोरणाला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे नक्षलवादी हिंसेचा मार्ग सोडू शकतील.
पुनर्वसन धोरणांतर्गत मदत
शर्मा म्हणाले की, जिल्ह्यात ‘पूना नर्कोम अंतर्गत ३० गावांतील१७६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सर्व आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांसोबत जेवणही केलं, यावेळी सीआरपीएफचे अधिकारीही उपस्थित होते. जिल्ह्यात मोठ्या संख्येने नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत.
Forty-three Naxalites including a Naxalite commander and nine women surrendered in Chhattisgarh sukama district
महत्त्वाच्या बातम्या
- फक्त उत्तर प्रदेशातच महिलांसाठी 40 टक्के जागा का, इतर राज्यांत महिला नाहीत?’ मायावतींचा काँग्रेसवर निशाणा
- भाजपने मला १०० कोटींची ऑफर दिलेली , शशिकांत शिंदेंच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकर यांनी दिली ‘ ही ‘ प्रतिक्रिया
- Lakhimpur : रात्री उशिरापर्यंत रिपोर्ट ची वाट पाहिली ; योगी सरकारला सुप्रीम कोर्टाने फटकारले , पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार
- सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून पुण्यात 31 वर्षीय तरुणीवर सलग दोन वर्षे बलात्कार
- कॅप्टन साहेबांनी धर्मनिरपेक्ष अमरिंदरसिंगांना “मारले”;काँग्रेसचे नेते एकापाठोपाठ एक बरसले