• Download App
    सहाव्या निकाहच्या तयारीत असलेल्या यूपीच्या माजी मंत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल, तिसऱ्या पत्नीने तीन तलाकवरून पोलिसांत घेतली धाव । former up minister chaudhary bashir third wife nagma filed triple talaq case

    सहाव्या निकाहच्या तयारीत असलेल्या यूपीच्या माजी मंत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल, तिसऱ्या पत्नीने तीन तलाकवरून पोलिसांत घेतली धाव

    उत्तर प्रदेश सरकारमध्ये माजी मंत्री राहिलेल्या चौधरी बशीर सध्या अडचणीत आले आहेत. बशीर यांच्या पत्नी नगमा यांनी त्यांच्याविरुद्ध तिहेरी तलाकचा गुन्हा दाखल केला आहे. नगमा यांचा आरोप आहे की, बशीर यांच्या सहाव्या निकाहची माहिती मिळाल्यानंतर त्या सासरच्या घरी गेल्या होती, तेथे माजी मंत्र्याने त्यांना शिवीगाळ करत तिहेरी तलाक देऊन दूर केले. नगमा या बशीर चौधरी यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत. former up minister chaudhary bashir third wife nagma filed triple talaq case


    विशेष प्रतिनिधी

    आग्रा : उत्तर प्रदेश सरकारमध्ये माजी मंत्री राहिलेल्या चौधरी बशीर सध्या अडचणीत आले आहेत. बशीर यांच्या पत्नी नगमा यांनी त्यांच्याविरुद्ध तिहेरी तलाकचा गुन्हा दाखल केला आहे. नगमा यांचा आरोप आहे की, बशीर यांच्या सहाव्या निकाहची माहिती मिळाल्यानंतर त्या सासरच्या घरी गेल्या होती, तेथे माजी मंत्र्याने त्यांना शिवीगाळ करत तिहेरी तलाक देऊन दूर केले. नगमा या बशीर चौधरी यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत.

    2012 मध्ये झाले होते लग्न

    ताजगंज परिसरात राहणाऱ्या नगमा म्हणाल्या की, त्यांचा निकाह 11 नोव्हेंबर 2012 रोजी माजी मंत्री चौधरी बशीर यांच्याशी झाले होते. त्यांना दोन मुलेही आहेत. नगमा यांचा आरोप आहे की, लग्नापासून त्यांचा पती आणि सासरचे लोक त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. याविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती, मागच्या तीन वर्षांपासून त्या माहेरच्या घरी राहत आहेत.

    काय आहे तक्रार?

    नगमा म्हणाल्या की, त्यांना 23 जुलै रोजी कळले की त्यांचे पती बशीर सहावे लग्न करणार आहेत. यानंतर जेव्हा त्या तिच्या सासरच्या घरी गेल्या, तेव्हा त्यांच्या पतीने त्यांना तिथे शिवीगाळ केली. एवढेच नाही, तर तिहेरी तलाक देऊन त्यांना घराबाहेर हाकलण्यात आले. यानंतर तिने मंटोला पोलीस स्टेशनमध्ये पतीविरोधात तक्रार दाखल केली. यासंदर्भात पोलीस स्टेशन मंटोलाचे निरीक्षक विनोद कुमार म्हणाले की, पोलिसांनी मुस्लिम महिला संरक्षण कायद्याच्या कलम 3/4 आणि भादंवि कलम 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    पहिला निकाह सपा नेत्या गजाला यांच्याशी

    माजी मंत्र्याची पत्नी नगमा यांचा एक व्हिडिओ मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात त्यांनी पतीवर मानसिक आणि शारीरिक छळाचे आरोप केले आहेत. माजी मंत्री चौधरी बशीर यांनी पहिला निकाह समाजवादी पक्षाच्या नेत्या गजाला यांच्याशी केले होते. बशीर यांनी दिल्लीच्या रुबिनाशी दुसरा आणि मंटोलाच्या नगमाशी तिसरा निकाह केला. आता ते सहाव्यांदा निकाह करण्याची तयारी करत आहेत.

    former up minister chaudhary bashir third wife nagma filed triple talaq case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!