कोरोनाची लागण झाल्याने अनेकांचे जीव जात आहेत. अनेकजण अत्यवस्थ होत आहेत. मात्र कोरोनाविरुद्धच्या लढाईत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज चाकूरकर यांनी विजय मिळवला आहे. वयाच्या 86 व्यावर्षी त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली, हे विशेष. Former Union Home Minister Chakurkar, Free from Covid-19 at the age of 86, gave ‘this’ gift to the doctors who treated him
प्रतिनिधी
नवी दिल्ली : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी वयाच्या ८६व्या वर्षी कोरोनावर मात करत कोरोनाविरुद्धच्या लढ्याला प्रेरणा दिली आहे. चाकूरकर हे सध्या दिल्लीत असून रविवारी (दि. 9) ते कोरोनामुक्त झाले.
चाकूरकर यांचा अंगरक्षक कोरोनाबाधीत झाला होता. त्याचवेळी चाकूरकर यांनाही खोकला सुरु झाला. त्यामुळे त्यांचीही चाचणी घेतली असता ते पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. त्यामुळे विनाविलंब त्यांच्यावर उपचार सुरु झाले. तातडीने मिळालेल्या उपचारांमुळे त्यांची प्रकृती वेगाने सुधारल्याचे सांगण्यात आले. लसीकरण केल्याचाही फायदा चाकूरकर यांना मिळाला असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली.
कोरोनामुक्त झाल्यानंतर चाकूरकर यांनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले. रुग्णालयातून परतण्यापूर्वी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना त्यांनी रोपांची भेट दिली. चाकूरकर सध्या दिल्लीत असून त्यांची प्रकृती झपाट्याने पूर्ववत होत आहे.