पंजाब काँग्रेसमध्ये नवज्योत सिद्धूंच्या सुरू असलेल्या मानापमान नाट्यादरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग बुधवारी संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. अमित शहा यांच्याशी कॅप्टनची बैठक सुरू आहे. मात्र, कालच कॅप्टन म्हणाले होते की, मी कोणत्याही राजकारण्याला भेटणार नाही. दिल्लीत जाईन ते फक्त घर रिकामे करण्यासाठीच! Former Punjab CM and Congress leader Captain Amarinder Singh reaches the residence of Union Home Minister Amit Shah in New Delhi
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमध्ये नवज्योत सिद्धूंच्या सुरू असलेल्या मानापमान नाट्यादरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग बुधवारी संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. अमित शहा यांच्याशी कॅप्टनची बैठक सुरू आहे. मात्र, कालच कॅप्टन म्हणाले होते की, मी कोणत्याही राजकारण्याला भेटणार नाही. दिल्लीत जाईन ते फक्त घर रिकामे करण्यासाठीच!
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग कालच दिल्लीला पोहोचले होते. मात्र, काल, माध्यमांशी बोलताना त्यांनी दावा केला की, त्यांच्याकडे कोणताही राजकीय कार्यक्रम नाही. मात्र, आता अमित शहांशी सुरू असलेल्या बैठकीत पक्ष प्रवेशाबाबत बोलणी सुरू असल्याच्या चर्चां सुरू झाल्या आहेत.
कॅप्टनचा काल नकार, आज अचानक भेट
चंदिगडहून दिल्लीला पोहोचल्यावर कोणाची भेट घेणार आहात या प्रश्नावर कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले होते, ‘मी घरी जाईन. माझ्या वस्तू गोळा करून पंजाबला जाईन. माजी मुख्यमंत्री म्हणाले होते, ‘येथे मी कोणत्याही राजकीय नेत्याला भेटणार नाही. कोणत्याही प्रकारचा राजकीय कार्यक्रम नाही. मी कपूरथला हाऊस रिकामे करण्यासाठी आलो आहे जे मुख्यमंत्र्यांचे घर आहे.”
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यापूर्वी त्यांच्या मीडिया सल्लागाराने, ते एका खासगी दौऱ्यावर असल्याची माहिती ट्वीट केली, त्या दरम्यान ते त्यांच्या काही मित्रांना भेटतील आणि कपूरथला हाऊस रिकामे करतील. या प्रवासावर कोणतेही अंदाज बांधू नये, असे सांगण्यात आले होते.
दिल्लीत येण्यापूर्वी नवज्योतसिंह सिद्धू यांनी पंजाब प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला होता. सिद्धू यांच्या राजीनाम्यावर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विट करून म्हटले होते की, “मी सांगितले होते की तो स्थिर माणूस नाही. सिद्धू पंजाबसारख्या सीमावर्ती राज्यासाठी योग्य नाहीत.”
Former Punjab CM and Congress leader Captain Amarinder Singh reaches the residence of Union Home Minister Amit Shah in New Delhi
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात पाऊस आणि पुरामुळे 22 लाख हेक्टरवरची पिके उद्ध्वस्त, मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले – ‘शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, मी त्यांना संकटातून बाहेर काढेन!’
- मोदी मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय : शाळांमध्ये सुरू होणार पीएम-पोषण योजना, ईसीजीसीचा आयपीओ येणार
- कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला दाखवला आरसा, म्हणाले, पक्षाला अध्यक्ष नसणे हे दुर्भाग्य, सीडब्ल्यूसीची बैठक घ्यावी!
- कोविड कव्हर विम्याचे तब्बल 31,624 कोटी रुपयांचे दावे; देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातील विमा दावे सर्वाधिक
- मुंबई, कोकणासह अनेक जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता, आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू; 4 जिल्ह्यांत अलर्ट