Former PM Dr Manmohan Singh : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारांसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशातील वाढत्या कोरोना संसर्गानंतर त्यांनी नुकतेच पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून सल्ला दिला होता. Former PM Dr Manmohan Singh tested corona Positive, undergoing treatment at AIIMS
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारांसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशातील वाढत्या कोरोना संसर्गानंतर त्यांनी नुकतेच पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून सल्ला दिला होता.
उल्लेखनीय बाब म्हणजे, मनमोहन सिंग यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली. पंतप्रधानांना नुकत्याच पाठवलेल्या आपल्या पत्रात त्यांनी देशात लसीकरण वाढवण्याची गरज व्यक्त केली होती. मनमोहन सिंग म्हणाले होते की, केंद्राने राज्यांशी समन्वय साधून पारदर्शी पद्धतीने औषधे व ऑक्सिजन वितरणाची रूपरेखा स्पष्ट केली पाहिजे. याशिवाय कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणही वाढवले पाहिजे.
मनमोहन सिंग आपल्या पत्रात असेही म्हणाले होते की, केंद्राने राज्यांना फ्रंटलाइन वर्कर्सची व्याख्या ठरवण्याचा अधिकार द्यावा. जेणेकरून जे 45 वर्षांपेक्षाही कमी वयाचे फ्रंटलाइन वर्कर्स बाहेर पडत आहेत, त्यांना लसीकरण करता येईल. याशिवाय लसीकरणाच्या संख्येपेक्षा लोकसंख्येच्या किती टक्के लोकांना लसीकरण झाले, यावर जास्त लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले होते.
Former PM Dr Manmohan Singh tested corona Positive, undergoing treatment at AIIMS
महत्त्वाच्या बातम्या
- अफवा पसरवणाऱ्या नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी
- Vaccination : अमेरिका, इंग्लंड, जपानच्या लसींना मंजुरीची गरज नाही, लवकरच भारतात होतील उपलब्ध, अमित शाहांनी दिली ग्वाही
- संजय राऊत म्हणतात, ‘देशात युद्धसदृश परिस्थिती, कोरोनावर चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा!’
- WATCH : लॉकडाऊनच्या आधी दिल्लीत दारूसाठी झुंबड, महिला म्हणते – ‘इंजेक्शननं काही होत नाही, दारूनं होईल फायदा!’
- ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे घेतला निर्णय