वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना अटक केली आहे. हिमालयन योगी घोटाळा प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली. गोपनीय माहिती शेअर करण्यासह शेअर बाजारात गंभीर अनियमितता केल्याचा आरोप चित्रा रामकृष्ण यांच्यावर आहे. Former NSE MD & CEO Chitra Ramakrishna Arrested by CBI in ‘Himalayan Yogi’ Scandal
“हिमालयन योगी” म्हणून संबोधल्या जाणाऱ्या बाहेरील व्यक्तीसोबत गोपनीय माहिती शेअर करण्यासह शेअर बाजारात गंभीर अनियमितता केल्याचा आरोप चित्रा रामकृष्ण यांच्यावर आहे. दिल्ली न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर हि कारवाई केली आहे. गेल्या चार वर्षांत चित्रा रामकृष्णविरुद्धच्या तपासात निष्क्रियता दाखवल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयवर ताशेरे ओढल्यानंतर ही अटक झाली आहे.
Former NSE MD & CEO Chitra Ramakrishna Arrested by CBI in ‘Himalayan Yogi’ Scandal
महत्त्वाच्या बातम्या
- युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याच्या मोहीमेचे जर्म राजदूतांकडून कौतुक
- कॉँग्रेस आमदाराचे पोलीस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन, सात मिनिटांत दिल्या १०० शिव्या
- मुस्लिम महिलांचे लग्नाचे वय वाढवण्यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंच देशभरात प्रचार करणार
- उत्तर प्रदेशातील ८० विरुध्द २० ची लढाई, योगी आदित्यनाथ यांचा ३२५ जागा जिंकण्याचा दावा