• Download App
    माजी आमदाराचे तिकिट चोवीस तासांत कापून अखिलेश यादव यांनी दिली बिकिनी गर्लला उमेदवारी|Former MLA's ticket was cut in 24 hours and Akhilesh Yadav nominated Bikini Girl

    माजी आमदाराचे तिकिट चोवीस तासांत कापून अखिलेश यादव यांनी दिली बिकिनी गर्लला उमेदवारी

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : माजी आमदाराला तिकिट दिले असताना चोवीस तासांत ते बदलून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एक बिकिनी गर्लला उमेदवारी दिली आहे. समाजवादी पक्षाने सुरुवातीला राठ विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार गयादीन अनुरागी यांना तिकीट दिलं होतं. परंतु २४ तासांच्या आता त्यांचा पत्ता कट करत चंद्रवती वर्मा यांना उमेदवार म्हणून घोषित केले.Former MLA’s ticket was cut in 24 hours and Akhilesh Yadav nominated Bikini Girl

    चंद्रवती वर्मा या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. त्यांचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात चंद्रवती वर्मा त्यांच्या दोन मैत्रिणीसोबत एका सिनेमातील गाण्यावर थिरकताना दिसत आहे. दुसºया व्हिडीओत स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग कॉस्ट्यूममध्ये दिसत आहेत. दोन्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चंद्रवती वर्मा जिल्ह्यात चचेर्चा विषय बनल्या आहेत.



    इटौरा गावातील रहिवासी धनीराम वर्मा यांची मुलगी चंद्रवती हैदराबादमध्ये जिम ट्रेनर आहे. इंटर कॉलेजमध्ये पदवीचं शिक्षण घेऊन त्यांनी क्रिडा क्षेत्रात रस असल्याने फिटनेस ट्रेनर म्हणून करिअर केले. काही काळ एका जिममध्ये काम केल्यानंतर त्यांनी स्वत:ची कंपनी उघडली. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राठ विधानसभा मतदारसंघात सक्रीय सहभाग नोंदवला.

    समाजवादी पक्षाने सुरुवातीला राठ विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार गयादीन अनुरागी यांना तिकीट दिले होते. परंतु २४ तासांच्या आता त्यांचा पत्ता कट करत चंद्रवती वर्मा यांना उमेदवार म्हणून घोषित केले.चंद्रवती वर्मा अनुसूचित जातीमधील आहे.

    त्यांनी प्रेमविवाह केला होता. जालौन जिल्ह्यातील गोरन गावातील हेमेंद्र सिंह राजपूत यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर दोघांमध्ये प्रेमाचं नातं निर्माण झालं. त्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर हेमेंद्र आणि चंद्रवती यांनी एकत्र हैदराबाद येथे जीम ट्रेनर म्हणून काम केले. २८ डिसेंबर २०२० मध्ये राठीत दोघांनी मोठ्या दिमाखात लग्न केले.

    काँग्रेस उमेदवाराचाही फोटो व्हायरलसमाजवादी पक्षाचे उमेदवार चंद्रवती वर्मा यांच्याआधी हस्तिनापूर येथील काँग्रेसचे उमेदवार आणि अभिनेत्री अर्चना गौतम त्यांच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत आल्या. काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर सोशल मीडियावर अर्चना गौतम यांचे अनेक फोटो व्हायरल झाले. अर्चना गौतम या मिस बिकनी इंडियाही राहिल्या होत्या.

    Former MLA’s ticket was cut in 24 hours and Akhilesh Yadav nominated Bikini Girl

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Operation Sindoor : पाकिस्तानला आत घुसून मारणार, बचावाची एकही संधी नाही देणार; आदमपूर हवाई तळावरून मोदींची गर्जना!!

    Dr. Subbanna Ayyappan : पद्मश्री डॉ. सुब्बन्ना अय्यपन यांचा संशयास्पद मृत्यू; श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीत मृतदेह आढळला

    Posters of Pahalgam : पहलगाम दहशतवाद्यांचे पोस्टर्स प्रसिद्ध, २० लाख रुपयांचा इनाम जाहीर