विशेष प्रतिनिधी
दिल्ली : २० सप्टेंबर रोजी फेसबुक इंडियाने माजी आयएएस अधिकारी आणि उबरचे माजी कार्यकारी राजीव अग्रवाल यांची सार्वजनिक धोरण संचालक म्हणून नियुक्ती केली. ह्याआधी ह्या पदावर अंखी दास काम करायच्या. मागे देशातील उजव्या विचारसरणीच्या नेत्यांविरूद्ध द्वेषयुक्त विधान केल्यामुळे त्या वादातही सापडल्या होत्या.
Former IAS rajeev agrawal has been appointed as facebook india’s head of public policy
या पदावर रुजू झालेले अग्रवाल भारतातील फेसबुकसाठी महत्त्वाचे धोरण आणि विकास उपक्रमांची नवीन व्याख्या बनवण्याचा प्रयत्न करतील. तसेच युजर्सची सुरक्षा, डेटा संरक्षण, गोपनीयता आणि इंटरनेट प्रशासन यांचाही समावेश असेल. या संबंधीही महत्त्वाचे बदल करण्यावर विशेष भर देण्यात येईल असे स्टेटमेंट मध्ये सांगण्यात आले आहे. राजीव अग्रवाल फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांना रिपोर्टिंग करतील. ह्याआधी अग्रवाल उबर कंपनीमध्ये भारत आणि दक्षिण आशियासाठी सार्वजनिक धोरण विभागाचे प्रमुख म्हणून काम करायचे.
अग्रवाल यांना भारतीय प्रशासकीय अधिकारी (IAS) म्हणून २६ वर्षांचा मोठा अनुभव आहे. उत्तर प्रदेश राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये त्यांनी जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम केले आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी बौद्धिक संपदा हक्कांवरील भारताचे पहिले राष्ट्रीय धोरण (IPRs), उद्योग आणि अंतर्गत व्यापारच्या (M/o कॉमर्स) संवर्धन विभागात सहसचिव म्हणून देखील काम केले आहे.
जागतिक अर्थ व्यवस्थेत डिजिटल ट्रान्सफॉर्ममेशन एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसून येतंय. अशावेळी अग्रवाल यांच्या नेमणूकीमुळे ट्रान्सपरंसी, जबाबदारी, सशक्त आणि सुरक्षित समुदाय या मुख्य मुद्यावर काम केले जाईल अशी अपेक्षा आहे.
Former IAS rajeev agrawal has been appointed as facebook india’s head of public policy
महत्त्वाच्या बातम्या
- MeTooचा आरोप असलेला नेता बनणार पंजाबचा नवा मुख्यमंत्री, चरणजीतसिंग चन्नी यांच्या निवडीवरून विरोधकांचे राहुल गांधींवर टीकास्र
- आई-वडिलांचा छळ करणाऱ्या मुलांनो घरातून बाहेर पडा, उच्च न्यायालयाचे आदेश
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती अद्याप कायम, काही शहरांमध्ये वाढतेय रुग्णांची संख्या
- परदेशी पर्यटकांना लवकरच भारतात येण्याची परवानगी दिली जाणार
- मेंदूचा सोध व बोध : प्रत्येकाच्या मेंदूत असते तीन प्रकारची स्मरणशक्ती