वृत्तसंस्था
लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियातून जोरदार फैलावली. पण ही बातमी खोटी असून त्यांची तब्येत सुधारत आहे आणि ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत, असा महत्त्वपूर्ण खुलासा डॉक्टरांनी केला आहे.Former CM Kalyan singh health stable, clarifies hospital administrastion
डॉ. राम मनोहर लोहिया सरकारी रूग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. कालच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, कल्याण सिंग यांचे चिरंजीव खासदार राजवीर सिंग आदींनी रूग्णालयातील अतिदक्षता विभागात जाऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.
कल्याण सिंग यांच्याशी आपली थोडा वेळ बातचीत झाल्याचे नड्डा यांनी नंतर पत्रकारांना सांगितले. त्यांनी आपल्या बोलण्याला प्रतिसाद दिल्याचे नड्डा म्हणाले.
ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. धीमन यांनी सांगितले. त्यांचे इन्फेकशन कमी झाले आहे आणि त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची गती सामान्य आहे, असे ते म्हणाले.
पण आज सकाळी कल्याण सिंग यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियातून पसरली. त्यांना श्रद्धांजली वाहणारे मेसेज फिरू लागले. त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने त्यांच्या तब्येतीविषयी खुलासा केला आहे.
Former CM Kalyan singh health stable, clarifies hospital administrastion
विशेष प्रतिनिधी
- जगभरातील कोरोना बळींची संख्या ४० लाखांच्या पुढे, डेल्टामुळे चिंतेत भर
- कोरोनाच्या पहिल्या लाटेचा गरीब महिलांना फटका
- वुहानच्या प्रयोगशाळेत कोणीही आजारी नव्हते, ऑस्ट्रेलियातील संशोधकांचा धक्कादायक खुलासा
- हैतीचे राष्ट्राध्यक्ष जोव्हेनल मॉइज यांची गोळ्या झाडून हत्या
- सिरमला मुलांवरील चाचण्यांसाठीची परवानगी केंद्र सरकारने नाकारली