विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : माजी विमान वाहतूक मंत्री आणि विद्यमान खासदार. पण कमर्शीअल पायलटची नोकरी करत आहे हे पाहून कोणालाही आश्चर्यच वाटेल.असाच आश्चर्याचा धक्का द्रविड मुनेत्र कळघमचे (द्रुमुक)खासदार दयानिधी मारन यांना बसला. दिल्लीहून चेन्नईला विमानाने येत असताना आपल्या विमानाचे पायलट राजीव प्रताप रुडी असल्याचे त्यांना समजले.Former Civil Aviation Minister becomes pilot, MP Dayanidhi Maran tells the story of a plane ride with Rajiv Pratap Rudy
याबाबत दयानिधी मारन यांनी म्हटले आहे की, ते दिल्लीमध्ये संसदीय समितीच्या बैठकीसाठी आले होते. परत चेन्नईला जाताना ते इंडिगोच्या विमानात बसले. ते पहिल्याच रांगेत होते. त्याच वेळी विमानाच्या क्रू ने घोषणा केली की बोर्डींग पूर्ण झाले आहे. त्याच वेळी विमानाचे पायलट आले आणि त्यांना म्हणाले की अरे वा! तुम्हीही याच विमानातून प्रवास करीत आहात का? पायलटने मास्क घातलेला असल्याने त्यांना ओळखले नाही.
मारन पुढे म्हणतात, मी होकारार्थी मान हलविली पण पायलटला ओळखले नाही. मास्कमधून ते हसत असल्याचे दिसत होते. ते म्हणाले, तर तुम्ही मला ओळखले नाही. तेव्हा मला समजले की विमानाचे पायलट दुसरे-तिसरे कोणी नसून माझे सहकारी आणि वरिष्ठ खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री असलेले राजीव प्रताप रुडी आहेत. ते माझे खूप चांगले मित्र आहेत.
मारन यांनी म्हटले आहे की माझा डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. दोन तासांपूर्वी ते आणि मी एस्टिमेट कमीटीच्या गहन चर्चेत सहभागी झालेलो होतो. आता त्यांना पायलटच्या भूमिकेत बघत होतो. पण ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे की मी त्या विमानातून प्रवास करत होतो ज्याचे पायलट माझे चांगले मित्र आणि सहकारी आहेत.
मारन यांनी म्हटले आहे की माझे वडील केंद्रामध्ये व्यापार मंत्री असताना राजीव प्रताप रुडी हे त्यांचे राज्य मंत्री होते.राजीव प्रताप रुडी हे बिहारमधील छपरा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्याचबरोबर त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रीपदही भूषविले आहे.
विद्यार्थी नेता असलेल्या राजीव प्रताप रुडी यांनी अमेरिकेत कमर्शीअल पायलटचे प्रशिक्षण घेतले आहे. पाटणा येथील एका कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करत असतानाच वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी १९९० मध्ये ते बिहारमध्ये विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर १९९६ आणि १९९९ मध्ये छपरा लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात १९९९ साली ते व्यापार विभागाचे राज्य मंत्री होते. त्यानंतर त्यांच्याकडे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभारही देण्यात आला होता. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे कौशल्य विकास मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला होता. मात्र, २०१७ मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
Former Civil Aviation Minister becomes pilot, MP Dayanidhi Maran tells the story of a plane ride with Rajiv Pratap Rudy
महत्त्वाच्या बातम्या
- माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ अ नुसार गुन्हे नोंदवू नका, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राज्यांना सूचना
- रेल्वे स्टेशन की विमानतळ, गुजरातमधील गांधीनगर स्टेशनवर चक्क फाईव्ह स्टार हॉटेल
- ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेत्री करिना कपूरविरुध्द तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी
- ‘छोट्या माणसा’ला शरद पवारांनी घरी बोलावलेच नाही, नाना पटोले यांनी केला खुलासा