Soli Sorabjee Death : देशाचे माजी अटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर सोली सोराबजी यांना दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1989 ते 1990 आणि पुन्हा 1998 ते 2004 या काळात सोराबजी यांनी भारताचे अॅटर्नी जनरल म्हणून काम पाहिले. Former Attorney General Soli Sorabjee Death Due To Covid 19
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाचे माजी अटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर सोली सोराबजी यांना दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1989 ते 1990 आणि पुन्हा 1998 ते 2004 या काळात सोराबजी यांनी भारताचे अॅटर्नी जनरल म्हणून काम पाहिले.
माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांना सर्वोच्च न्यायालयाने श्रद्धांजली वाहिली आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे की, मानवी हक्कांसाठी संघर्ष करणार्या सोली सोराबजी यांच्या मृत्यूचे ऐकून फार वाईट वाटले, आम्ही दिवंगत आत्म्यासाठी प्रार्थना करतो.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, सोली सोराबजीच्या निधनानंतर आम्ही भारताच्या न्यायव्यवस्थेचे प्रतीक गमावले आहे. घटनात्मक कायदा व न्याय प्रणालीच्या उत्क्रांतीवर खोलवर प्रभाव पाडणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी ते होते. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित ते बहुचर्चित न्यायमूर्तींपैकी होते. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल व सहकार्यांबद्दल माझ्या संवेदना आहेत.
दुसरीकडे, भारताच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सोली सोराबजी एक उत्कृष्ट वकील आणि विचारवंत होते. कायद्याच्या माध्यमातून गरीब व शोषितांना मदत करण्यात ते अग्रेसर होते. भारताच्या अटर्नी जनरल पदाच्या त्यांच्या उल्लेखनीय कार्यकाळासाठी ते स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल माझी संवेदना आहे.
1953 मध्ये सोराबजी यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली होती. 1971 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता म्हणून त्यांची नेमणूक झाली. ते दोन वेळा भारताचे अटर्नी जनरल होते. सोराबजी पहिल्यांदा 1989 ते 90 आणि मग 1998 ते 2004 पर्यंत दुसऱ्यांदा अटर्नी जनरल राहिले. नायजेरियातील मानवाधिकारांच्या स्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी त्यांची संयुक्त राष्ट्र संघाने 1997 मध्ये विशेष दूत म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर 1998 ते 2004 या काळात ते मानवाधिकार प्रोत्साहन व संरक्षणावर संयुक्त राष्ट्र उपआयोगाचे सदस्य आणि नंतर अध्यक्ष झाले.
Former Attorney General Soli Sorabjee Death Due To Covid 19
महत्त्वाच्या बातम्या
- ‘रॉबिनहूड बनू नका’, दिल्लीहून रेमडेसिव्हिर खरेदीप्रकरणी हायकोर्टाने खा. सुजय विखेंना खडसावले
- WATCH : रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडेल, आमदार असल्याची लाज वाटतेय, उद्विग्न आप आमदाराचे दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचे आवाहन
- कोल्हापूर, सांगलीला पावसाने झोडपले; केळी, पापईच्या बागांचे प्रचंड नुकसान
- रेल्वे स्थानकावर परप्रांतीयांची पुण्यात लूट, २२ पोलिसांच्या मुख्यालयामध्ये बदल्या
- आमने-सामने : बॉलिवुड क्वीन विरूद्ध कोन्ट्रवर्सि क्विन ; भारतात कोरोनाने हाल कंगनाची खंत ; ए बाई तू मदत कर ना भडकली राखी सावंत !