• Download App
    तुर्कीचा भारतविरोध विसरून भारताची तुर्कीला मदत; तुर्की महिलेची भारतीय सैन्याच्या महिला अधिकाऱ्याला मिठी Forgetting Turkey's anti-India, India's help to Turkey

    तुर्कीचा भारतविरोध विसरून भारताची तुर्कीला मदत; तुर्की महिलेची भारतीय सैन्याच्या महिला अधिकाऱ्याला मिठी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आलेल्या भीषण भूकंपांमध्ये जीव गमावणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. ताज्या आकडेवारीनुसार मृतांच्या आकड्याने १९००० चा टप्पा ओलांडला आहे. Forgetting Turkey’s anti-India, India’s help to Turkey

    भारताने या देशांना मदतीचा हात दिला आहे. वास्तविक तुर्कस्तान हा देश भारत विरोधी भूमिका घेऊन नेहमी पाकिस्तानची पाठराखण करतो. भारतातल्या फुटीरतावाद्यांना आणि लिबरल्सना साथ देतो. पण भारताने तुर्कस्तानच्या संकट काळात त्या देशाला मदतीचा हात दिला आहे.

    सिरीयाने पण भारतीयांकडे मदतीचे हात पसरले आहेत. भारतीय लोकांनी शक्य तेवढी मदत करावी, अशी विनंती सिरीयाने केली आहे. अशातच अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणारा फोटो समोर आला आहे.


    तुर्कीने २२७ बेकायदा स्थलांतरितांना अफगाणिस्तानमध्ये पाठवले परत


     

    भारताने तुर्की आणि सिरीयामध्ये मदत पोहोचविण्यासाठी ऑपरेशन दोस्त सुरू केले आहे. तसे पाहता तुर्कस्तान हा भारताचा विरोधक देश आहे. तेथील राज्यकर्ते पाकिस्तानला काश्मीर मिळविण्यासाठी प्रोत्साहन देतात. असे असले तरी भारताने हे सारे विसरून मैत्रीचा हात पुढे केला आहे.

    भारतीय लष्कर आणि एनडीआरएफची पथके तातडीने तुर्कीमध्ये दाखल झाली आहेत. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराने आपत्ती निवारण पथके आणि आर्मी फील्ड हॉस्पिटल तैनात केले आहेत. या पथकातील भारतीय कन्येला एका तुर्कीश महिलेने मीठी मारल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. भारतीय सैन्य करत असलेल्या मदतीमुळे या महिलेने आभार मानले आहेत.

    Forgetting Turkey’s anti-India, India’s help to Turkey

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका