वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात लव्ह जिहादच्या माध्यमातून मुसलमान जबरदस्तीने धर्मांतर करत असल्याची प्रकरणे दररोज घडत असताना, तर दुसरीकडे ख्रिस्ती मिशनरी प्रलोभने दाखवून धर्मांतर करतच असतात, अशा या धर्मांतराच्या विरोधात देशपातळीवर कायदा करण्यात यावा, यासाठी सुप्रीम कोर्टात सरकारने ठाम भूमिका मांडली आहे. त्यावर आज सुनावणी होऊन सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारने या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करून नेमका तोडगा सांगावा, असे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत. ‘Forced religious conversion serious issue’: Supreme Court asks Centre to file affidavit
त्याचबरोबर केंद्र सरकार या संदर्भात सर्व राज्यांकडून अधिकृत माहिती गोळा करत आहे. ती संकलित झाली की योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टात दिली असून सक्तीच्या धर्मांतराविरोधातील यांचे चिकेची पुढची सुनावणी सुप्रीम कोर्टाने 12 डिसेंबरला ठेवली आहे.
सक्तीच्या धर्मांतराविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर आज सोमवारी, 5 डिसेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तेव्हा केंद्र सरकारने आपली भूमिका मांडली. सक्तीचे धर्मांतर ही गंभीर बाब आहे. किंबहुना ती घटनेतील मूलभूत तत्वांच्या विरोधातील बाब आहे. धर्म स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये फसवणूक, जबरदस्ती, प्रलोभन किंवा अशा इतर मार्गांनी धर्मांतर करण्याचा अधिकार समाविष्ट नाही. त्यामुळे केंद्र सरकार सक्तीच्या धर्मांतराविरोधात कायदा करण्याचा बाजूने आहे, असे स्पष्टपणे नमूद केले. मुद्द्याची सुप्रीम कोर्टाने दखल घेऊन राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने नेमका काय तोडगा काढता येईल हे केंद्र सरकारने आवर्जून नमूद करावे, असे आदेश दिले.
९ राज्यांनी केला कायदे
ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हरियाणा या 9 राज्यांनी सक्तीचे धर्मांतर रोखण्यासाठी आधीच कायदे केले आहेत. यासोबतच महिला, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासह समाजातील दुर्बल घटकांना संरक्षण देण्यासाठी असे कायदे आवश्यक आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती सी. टी. रवी कुमार यांच्या खंडपीठासमोर सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ वकील अश्विनी उपाध्याय यांच्या या याचिकेवर सुनावणी झाली.
तर देशात हिंदू अल्पसंख्यांक होतील
जबरदस्तीने होणारे धर्मांतर थांबवले नाही, तर हिंदू लवकरच भारतात अल्पसंख्याक होतील, असे या याचिकेत म्हटले आहे. यापूर्वी 14 नोव्हेंबर रोजी या प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने सक्तीचे धर्मांतर हा अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचे म्हटले होते. त्यामुळे देशाच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले होते आणि सक्तीचे धर्मांतर रोखण्यासाठी कोणती पावले उचलली जाऊ शकतात याबाबत केंद्राला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. धर्मस्वातंत्र्य आहे, पण सक्तीच्या धर्मांतराला स्वातंत्र्य नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे नमूद केले होते. त्यावर केंद्र सरकारने देखील सुप्रीम कोर्टाच्या मताच्या अनुषंगानेच अनुकूल भूमिका घेतली. आता या संदर्भात 12 डिसेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
‘Forced religious conversion serious issue’: Supreme Court asks Centre to file affidavit
महत्वाच्या बातम्या
- गुजरात मध्ये मुसलमानांनी एकजूट होऊन काँग्रेसला मतदान करावे; इमाम शब्बीर सिद्दिकींचे आवाहन
- अफझलखानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण हटविले; अन्य गड किल्ल्यांवरचेही अतिक्रमण काढा; शिवप्रेमींचा आग्रह
- घाटकोपरमध्ये हरित लवादाच्या आरक्षित जागेवर मदरशाचे अवैध बांधकाम