• Download App
    बळजबरीने धर्मपरिवर्तन धर्माच्या प्रसाराचा उपाय नाही, आस्तिक-नास्तिकांना समान हक्क, अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी दिला ख्रिश्चन समाजाला विश्वास|Forced conversion is not a way to spread religion, believers have equal rights, minority affairs minister Mukhtar Abbas Naqvi assures Christian community

    बळजबरीने धर्मपरिवर्तन धर्माच्या प्रसाराचा उपाय नाही, आस्तिक-नास्तिकांना समान हक्क, अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी दिला ख्रिश्चन समाजाला विश्वास

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : बळजबरीने धर्मपरिवर्तन हे भारतासारख्या देशात कोणत्याही धर्माच्या प्रसाराचा उपाय असू शकत नाही. या देशात आस्तिक आणि नास्तिक दोघेही समान हक्कांसह अस्तित्वात आहेत, असा विश्वास अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी व्यक्त केला.Forced conversion is not a way to spread religion, believers have equal rights, minority affairs minister Mukhtar Abbas Naqvi assures Christian community

    देशाच्या विविध भागातील ख्रिश्चन समाजातील प्रमुख लोकांशी नकवी यांनी संवाद साधला. ते म्हणाले, भारत कधीही धार्मिक कट्टरता आणि असहिष्णुतेला बळी पडू शकत नाही; कारण हे जगातील सर्वांत मोठे आध्यात्मिक-धार्मिक ज्ञानाचे केंद्र आहे आणि सर्वधर्मसमभाव तसेच वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेचा प्रेरणास्त्रोत आहे.



    भारतात एकीकडे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, पारशी, ज्यू, बहाई आणि जगातील इतर विविध धर्मांना माननारे लोक राहतात, तर दुसरीकडे देशात कोट्यवधी नास्तिकही आहेत आणि या सर्वांना समान घटनात्मक आणि सामाजिक अधिकार आहेत.

    त्यामुळे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन हे कोणत्याही देशात कोणत्याही धर्माच्या प्रसाराचे माप असू शकत नाही. भारत हा जगातील एकमेव देश आहे, जिथे विविध धर्मांचे सण आणि इतर आनंदी प्रसंग एकत्र साजरे केले जातात. आपण हा सांस्कृतिक वारसा मजबूत ठेवण्याची गरज आहे.

    एकता आणि सौहार्दाच्या या रचनेला अडथळा आणण्याचा कोणताही प्रयत्न भारताच्या आत्म्याला दुखावेल.नकवी म्हणाले, जगातील जवळजवळ सर्व धर्मांचे अनुयायी भारतात राहतात. त्यांच्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक हक्कांची घटनात्मक सुरक्षा आणि सामाजिक हमी हे विविधतेत एकता असलेल्या आपल्या देशाच्या सामथ्यार्चे सौंदर्य आहे.

    भारताची सहिष्ण संस्कृती आणि सह-अस्तित्वाची बांधिलकी कोणत्याही परिस्थितीत कमकुवत होऊ दिली जाणार नाही, याची खात्री करणे आपली सामूहिक जबाबदारी आहे.

    Forced conversion is not a way to spread religion, believers have equal rights, minority affairs minister Mukhtar Abbas Naqvi assures Christian community

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- अवमान याचिकेसाठी आमची आवश्यकता नाही; अॅटर्नी जनरलची परवानगी घ्या