विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात पहिल्यांदाच करोना लस दुर्गम ठिकाणी पोहचवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. चार ते पाच तास वेळ लागणाºया २६ किलोमीटरचे अंतर ड्रोनच्या सहाय्याने अवघ्या १५ मिनिटांत कापण्यात आले. मणिपूरपासून आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराच्या या प्रयोगाची सुरुवात करण्यात आली.For the first time, drones were used to deliver vaccines to remote areas, covering a distance of 26 kilometers in just 15 minutes
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आनंद व्यक्त करताना म्हणाले, आज दक्षिण पूर्ण आशियात पहिल्यांदाच ड्रोननं व्यावसायिकरित्या उड्डाण घेतलं. यासाठी आयसीएमआर, मणिपूर सरकार, तांत्रिक कर्मचारी या सर्वांचं अभिनंदन. आज करोना लस पोहचवण्यात आलीय.
भविष्यात गरज भासल्यास एखाद्या ठिकाणी लाईफ सेव्हिंग ड्रग्जही पोहचविले जाऊ शकतात. तसंच शेतात कीटकनाशक आणि युरियाची फवारणीदेखील ड्रोनद्वारे केली जाऊ शकते.भारतातील दक्षिण – पूर्व आशिया भागात पहिल्यांदाच ड्रोनचा व्यावसायिक वापर करण्यात आला.
मणिूपरच्या विष्णूपूर ते करांग असा २६ किलोमीटरचा साधारणत: तीन ते चार तासांचा रस्ते प्रवास टाळून करोना लस पोहचवण्यात आल्या. यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आल्यानं हा प्रवास केवळ १५ किलोमीटरचा ठरला आणि हा प्रवास करण्यासाठी ड्रोनला केवळ १२ ते १५ मिनिटांचा वेळ लागला. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून करण्यात आलेला हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
मणिपूरच्या लोक टक तलाव ओलांडत करांग बेटावर ड्रोनच्या साहाय्यानं करोना लस पोहचवण्यात आल्या. संपूर्ण भारतीय बनावटीच्या या ड्रोननं ऑटोमॅटिक अर्थात स्वयंचलित पद्धतीने लसी पोहोचविण्यात आल्या.
मणिपूरच्या करांग भागाची लोकसंख्या जवळपास ३५०० आहे. यापैंकी ३० टक्के नागरिकांना करोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. येणाºया काही दिवसांत मणिपूरच्या आणखी दोन जिल्ह्यांत अशाच पद्धतीनं ड्रोनच्या सहाय्यानं करोना लस पोहचवण्याची योजना आहे.
For the first time, drones were used to deliver vaccines to remote areas, covering a distance of 26 kilometers in just 15 minutes
महत्त्वाच्या बातम्या
- Aryan Khan Drugs Case : शाहरुख खानच्या समर्थनार्थ आले शशी थरूर, आर्यनबद्दल म्हणाले – सहानुभूती ठेवा!
- माजी कर्मचाऱ्याचा फेसबुकवर मोठा आरोप, पैशांसाठी हेट स्पीचला चालना देते ही दिग्गज सोशल मीडिया कंपनी
- नवरात्रोत्सव २०२१ : रावणदहनाला प्रेक्षक बोलवू नका, लोकांना लाइव्ह पाहण्याची व्यवस्था करा, वाचा… गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना
- Pandora Papers Leak : सरकारने दिले चौकशीचे आदेश; आरबीआय, सीबीडीटी आणि ईडी अधिकाऱ्यांकडून संयुक्त तपास होणार
- कोरोनामुळे मृत्यू झाल्यास भरपाई : 30 दिवसांच्या आत पीडितांच्या कुटुंबीयांना 50 हजार देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश