• Download App
    जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी चने-फुटाणेच, तीन ते ८५ लाखांपर्यंत भरपाईची मागणी आणि हाता टिकवताहेत २३ हजार रुपये|For Jet Airways employees, the demand for compensation ranges from Rs 3 lakh to Rs 85 lakh, consorium reday to give only 23 thousand

    जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी चने-फुटाणेच, तीन ते ८५ लाखांपर्यंत भरपाईची मागणी आणि हाता टिकवताहेत २३ हजार रुपये

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : दिवाळखोरीत निघालेल्या जेट एअरवेज कर्मचा ऱ्यांची चेष्टाच करण्याचे कालरॉक-जालान कन्सोर्टियमने ठरविले आहे. कर्मचाऱ्यांनी तीन ते ८५ लाख रुपयांपर्यंतच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मात्र, कन्सोर्टियमने त्यांच्या हाता केवळ २३ हजार रुपये टिकविण्यास मान्यता दिलीआहे. हे तर चने-फुटाणेच असतील असे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.For Jet Airways employees, the demand for compensation ranges from Rs 3 lakh to Rs 85 lakh, consorium reday to give only 23 thousand

    जेट एअरवेजच्या दिवाळखोरीच्या ठराव प्रक्रियेसाठी कर्मचाऱ्यांचे मान्यताप्राप्त दावे 1,265 कोटी रुपयांचे आहेत. मात्र, कन्सोर्टियमने त्यांचे दावे निकाली काढण्यासाठी 52 कोटींचा प्रस्ताव ठेवला आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक कर्मचाºयाचे एअरलाईन्सकडे तीन ते ८५ लाख रुपयांचे देणे आहे.



    मात्र, सेटलमेंटमध्ये त्यांना केवळ २३ हजार रुपये देण्याचा प्रस्ताव प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. प्रत्येक कामगाराला 11,000 रुपये रोख, कामगारांच्या पालकांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती म्हणून 5,100 रुपये रोख, कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शालेय फी परतफेड म्हणून 5,100 रुपये रोख देण्याचे प्रस्तावित आहे.

    कंपनीच्या आकस्मितता निधीतून आठ कोटी रुपये यासाठी देण्यात येणार आहे. त्यचाबरोबर कॉपोर्रेट कर्जदारांकडून मिळालेल्या मालमत्ता विक्रीच्या रकमेतून अतिरिक्त रकमेची आवश्यकता असल्यास ती वापरली जातील.कालरॉक-जालान कन्सोर्टियमकडून जेट एअरवेजमध्ये 1,375 कोटी रुपयांची रोख गुंतवणूक होणार आहे.

    ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी मतदानाच्या प्रक्रियेतून मान्यता दिली तरच हा प्रस्ताव मान्य होणार आहे. मात्र, कर्मचाऱ्यांकडून हा मान्य होण्याची शक्यता कमीच आहे.कर्मचाºयांनी ३० दिवसांच्या आत हा प्रस्ताव मान्य केला नाही तर ही संपूर्ण प्रक्रिय रुद्द होईल.

    For Jet Airways employees, the demand for compensation ranges from Rs 3 lakh to Rs 85 lakh, consorium reday to give only 23 thousand

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    SC Notice : मनमानी विमान भाडेवाढीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागितले उत्तर; केंद्र, DGCA आणि AERA यांना नोटीस

    Delhi Blast, : दिल्ली स्फोटप्रकरणी अतिरेकी उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक; ड्रोन-रॉकेट बनवले, तांत्रिक मदत पुरवली

    CJI BR Gavai : सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचे आरक्षणावर मोठे वक्तव्य, अनुसूचित जातींतही (SC)लागू व्हावे ‘क्रीमी लेयर’