वृत्तसंस्था
जयपूर : कोरोनाला रोखण्यासाठी आणि रुग्ण वाचविण्यासाठी नवे उपाय शोधले जात आहेत. त्यात आता चेस्ट फिजिओथेरपीचा समावेश झाला आहे. ही थेरपी रुग्णासाठी वरदान आहे. For Coronavirus patient Chest physiotherapy Is Useful
राजस्थानच्या जयपूरमधील डॉक्टरांनी चेस्ट फिजिओथेरपी ही नवी उपचार पद्धती सुरु केली आहे. या थेरपीतून 15-20 दिवसांत 100 हून अधिक रुग्णांवर उपचार केले. त्याचे फार चांगले निकाल मिळाल्याचा दावा जयपूरच्या री-लाइफ हॉस्पिटलचे फिजिओथेरपिस्ट डॉ. अवतार डोई यांनी केला.
अनेकांची ऑक्सिजन पातळी आणि फुप्फुसांची रिकव्हरीही वेगाने झाली जे ऑक्सिजनवर होते त्यांची ऑक्सिजन पातळी या थेरपीमुळे सामान्य झाली आहे. काही दिवसांपूर्वी ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी रुग्णाला पोटावर झोपवले जात होते. त्याचप्रमाणे चेस्ट फिजिओथेरपीतूनही रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल वाढवून ती संतुलित ठेवली जाऊ शकते, असा डॉक्टरांचा दावा आहे.
दृष्टिक्षेपात उपचार पद्धती
1 )प्रथम रुग्णाच्या फुप्फुसातून कफ काढून टाकणे आवश्यक असते. त्यामुळे फुफ्फुस चांगले कार्य करू शकेल आणि रुग्ण श्वास घेईल.
2 )फुप्फुसातील घट्ट कफ सैल करण्यासाठी डॉक्टर औषधे देतात ज्याला वेळ लागतो. याउलट चेस्ट थेरपीमध्ये औषधांशिवाय कफ सैल पडतो आणि आपोआप शरीरातून बाहेर येतो.
For Coronavirus patient Chest physiotherapy Is Useful
महत्त्वाच्या बातम्या
- जगप्रसिद्ध स्पॅनिश चित्रकार पाब्लो पिकासोच्या चित्राची ७०० कोटीना विक्री ; न्यूयॉर्कमध्ये लिलाव
- Cyclone Tauktae : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवर एनडीआरएफ सतर्क, अनेक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता
- वांद्रेमध्ये 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन आरोपींना अटक, 19 मेपर्यंत कोठडी
- Maratha Reservation Issue : राज्यात पांढऱ्या पायाचे सरकार आल्याने मराठा आरक्षण झाले रद्द ठाकरे- पवार सरकारवर सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका