• Download App
    पश्चिम बंगाल पाठोपाठ गोव्यातही शरद पवारांची प्रचाराला हुलकावणी!!; ते उत्तर प्रदेशात जातील??Following West Bengal, Sharad Pawar's campaign in Goa too

    पश्चिम बंगाल पाठोपाठ गोव्यातही शरद पवारांची प्रचाराला हुलकावणी!!; ते उत्तर प्रदेशात जातील??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुका सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर प्रदेश आणि गोव्यात आपले काही उमेदवार निवडणुकीच्या रणमैदानात उतरवले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भली मोठी स्टार प्रचारकांची यादी ही प्रसिद्धीस दिली आहे. उत्तर प्रदेशासाठी 40 स्टार प्रचारकांची यादी आहे तर गोव्यासाठी 24 स्टार प्रचारकांची यादी होती. गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी मतदान आहे. त्याचा प्रचार आज संपला. पण प्रत्यक्षात गोव्याकडे राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमधले फारसे कोणी फिरकलेले दिसले नाही किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पश्चिम बंगाल प्रमाणेच गोव्याला ही प्रचारात हुलकावणी देऊन टाकली…!!Following West Bengal, Sharad Pawar’s campaign in Goa too

    पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका जेव्हा झाल्या, तेव्हा आपण पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला जाणार आहोत, असे पत्रकार परिषद घेऊन पवार यांनी जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा प्रचार दौराही आखला होता. परंतु प्रत्यक्षात पवार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी फिरकलेले दिसले नाहीत. बंगालची निवडणूक सात टप्प्यांमध्ये पार पडली पण पवार एकदाही त्या निवडणुकीच्या कालावधीत पश्चिम बंगालला गेले नाहीत.


    Sharad Pawar Birthday : वाढदिवशी पवारांनी सांगितली कृषिमंत्री असतानाची आठवण, म्हणाले- बांधिलकी असलेले कार्यकर्ते राष्ट्रवादीचे वैशिष्ट्य


     

    गोव्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या तिकिटावर नेमके उमेदवार किती उभे केलेत?, याचे गौडबंगाल कायम आहे. पण स्टार प्रचारकांची 24 जणांची यादी 3 नोव्हेंबर 3 फेब्रुवारी रोजी जाहीर केली होती. यामध्ये खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि अन्य बड्या नेत्यांची नावे होती. परंतु शरद पवार यांनी गोव्याला देखील पश्चिम बंगाल प्रमाणेच प्रचारात हुलकावणी दिल्याचे दिसले…!! पवार यांची एकही जाहीर प्रचार सभा तिथे झालेली दिसली नाही.

    त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 40 जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यातही राष्ट्रवादीचे बडे नेते आहेत. उत्तर प्रदेशात 58 मतदारसंघात दहा फेब्रुवारी रोजी मतदान होऊन गेले. 14 फेब्रुवारी ची रोजी होणाऱ्या मतदानाचा प्रचार आज संपला. पण या दोन्ही टप्प्यांमध्ये पवार उत्तर प्रदेशात देखील फिरकलेले दिसले नाहीत.उत्तर प्रदेशात मतदानाचे आणखी 5 टप्पे होणार आहेत. त्या काळात तरी शरद पवार उत्तर प्रदेशात प्रचार दौर्‍यासाठी फिरतील का?, असा सवाल आता विचारण्यात येत आहे.

    Following West Bengal, Sharad Pawar’s campaign in Goa too

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार