• Download App
    मोदी सरकार पाठोपाठ केरळच्या कम्युनिस्ट सरकारची देखील पेट्रोल डिझेलची दर कपात!! Following the Modi government, the Communist government of Kerala also reduced the price of petrol and diesel

    मोदी सरकार पाठोपाठ केरळच्या कम्युनिस्ट सरकारची देखील पेट्रोल डिझेलची दर कपात!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशातली महागाई गगनाला भिडलेली असताना महागाईचा भडक्यावर कठोर उपाययोजना म्हणून केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल वरच्या केंद्रीय उत्पादन शुल्कात सात 8.00 रुपयांची घट केली असून घरगुती गॅस सिलेंडर वर 200 रुपये अनुदान जाहीर केले आहे. केंद्र सरकारच्या पावलावर केरळच्या कम्युनिस्ट सरकारने देखील पुढचे पाऊल टाकले आहे. Following the Modi government, the Communist government of Kerala also reduced the price of petrol and diesel

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे. आज पासून पेट्रोल – डिझेलचे नवे दर लागू झाले. पेट्रोलवरचे केंद्रीय उत्पादन शुल्क 8.00 रुपयांनी कमी केल्यामुळे देशभरात पेट्रोल लिटरमागे 9.50 रुपयांनी कमी होईल, तर डिझेल 7.00 रुपयांनी कमी होईल.



    केंद्र सरकारने ही मोठी कर कपात त्यानंतर केरळमधील कम्युनिस्ट सरकारनेदेखील पेट्रोल आणि डिझेल वरील मूल्यवर्धित करात कपात केली आहे पेट्रोलवर 02:41 आणि डिझेलवर 01:36 रुपयांची कपात केल्याची माहिती केरळचे अर्थमंत्री के. एन. बालगोपाल यांनी फेसबुक पोस्टवरून दिली आहे.

    मात्र, अद्याप काँग्रेस अथवा बाकीच्या विरोधी पक्षाच्या शासित राज्यांनी कर कपात जाहीर केलेली नाही.

    – घरगुती गॅस वर 200 रुपये अनुदान

    एका वर्षाला घरगुती गॅसचा 12 सिलेंडर वर 200 रुपये अनुदान केंद्र सरकार देईल. याचा प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना म्हणजे 9 कोटी कुटुंबांना थेट लाभ होईल, असे निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.

    – सिमेंट, स्टील, प्लास्टिक वस्तू स्वस्त

    सिमेंट, स्टील हे अधिक उपलब्ध करून देण्यासाठी तसेच ते स्वस्त करण्यासाठी देखील केंद्र सरकार गंभीर उपाययोजना करत आहे, काही स्टील उत्पादनांच्या आणि प्लास्टिक उत्पादनांच्या कच्चा मालावर आयात शुल्क घटवले जात आहे तसेच काही स्टील उत्पादनांना अनुदान देखील दिले जाईल अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

    Following the Modi government, the Communist government of Kerala also reduced the price of petrol and diesel

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच’, युद्धबंदी दरम्यान भारतीय हवाई दलाचे मोठे विधान

    Understand Geo politics : अमेरिकन प्रेसने पसरविले भारत विरोधी narrative; पण प्रत्यक्षात भारताचे पाकिस्तान वरले हल्ले अचूक आणि assertive!!

    PM Modi : ऑपरेशन सिंदूरबद्दल पी. चिदंबरम यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक