• Download App
    लष्करात महिलांचे पाऊल पडते पुढे, पाच महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर बढती|Following in the footsteps of women in the army, five women officers were promoted to the rank of colonel

    लष्करात महिलांचे पाऊल पडते पुढे, पाच महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर बढती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय लष्करातही महिलांचे पाऊल आता पुढे पडत आहे.भारतीय लष्कराच्या निवड मंडळाने कॉर्प्स ऑफ सिग्नल, कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स आणि कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्समध्ये सेवा करणाऱ्या पाच महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर बढती दिली आहे.Following in the footsteps of women in the army, five women officers were promoted to the rank of colonel

    यापूर्वी पदोन्नतीची प्रणाली केवळ आर्मी मेडिकल कॉर्प्स, जज अ‍ॅडव्होकेट जनरल आणि आर्मी एज्युकेशन कॉर्प्समध्ये समाविष्ट असलेल्या महिला अधिकाऱ्यांना लागू होती. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, या अधिकाºयांना सेवेत 26 वर्षे पूर्ण झाल्यावर बढती देण्यात आली आहे.



     

    पदोन्नती मिळालेल्या 5 अधिकाऱ्यांमध्ये सिग्नल कॉर्प्सच्या लेफ्टनंट कर्नल संगीता सरदाना, एटए कॉर्प्सच्या लेफ्टनंट कर्नल सोनी आनंद आणि लेफ्टनंट कर्नल नवनीत दुग्गल आणि कॉर्प्स ऑ फ इंजिनियर्सच्या लेफ्टनंट कर्नल रीनु खन्ना आणि लेफ्टनंट कर्नल रिचा सागर यांचा समावेश आहे. ठरलेल्या शाखेव्यतिरिक्त इतर शाखांमध्ये कर्नल पदावर महिला अधिकºयांना पदोन्नती देणे हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

    सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात महिला उमेदवारांना एनडीएच्या परीक्षेला बसण्याची परवानगी देण्याची याचिका सुनावली होती. यामध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये महिलांना प्रवेश परीक्षा देण्याची परवानगी होती. यापूर्वी केवळ पुरुष उमेदवार एनडीएमध्ये सामील होऊ शकत होते. हा निर्णय भारतीय लष्करातील महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.

    Following in the footsteps of women in the army, five women officers were promoted to the rank of colonel

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार