• Download App
    बंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन! । FM Nirmala Sitaraman assurance to the business world, there will be no nationwide lockdown

    बंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन!

    FM Nirmala Sitaraman : संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. दररोज आढळणारी रुग्णसंख्या पावणे तीन लाखांच्या घरात पोहोचली आहे. तर देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येने एकोणीस लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा देशात लॉकडाऊन लागण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळेच अनेक राज्यांतून मजूर पलायन करून आपले मूळ गाव गाठत आहेत. दरम्यान, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योजकांना आश्वासन दिले आहे की, देशव्यापी लॉकडाऊन लादले जाणार नाही. FM Nirmala Sitaraman assurance to the business world, there will be no nationwide lockdown


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. दररोज आढळणारी रुग्णसंख्या पावणे तीन लाखांच्या घरात पोहोचली आहे. तर देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येने एकोणीस लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा देशात लॉकडाऊन लागण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळेच अनेक राज्यांतून मजूर पलायन करून आपले मूळ गाव गाठत आहेत. दरम्यान, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योजकांना आश्वासन दिले आहे की, देशव्यापी लॉकडाऊन लादले जाणार नाही.

    मायक्रो कंटेनमेंट झोनवर भर, देशव्यापी लॉकडाऊन नाहीच

    कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची भीती लक्षात घेता लॉकडाऊनबद्दल देशभरात विविध चर्चांना उधाण आले आहे. लॉकडाऊनची टांगती तलवार असल्याने मजुरांच्या स्थलांतराचे प्रमाणही वाढले आहे. कोरोना साथीच्या काळात फेडरेशन ऑफ इंडियन स्मॉल मीडियम एंटरप्राइजेजचे (एफआयएसएमई) अध्यक्ष अनिमेश सक्सेना यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी सरकारच्या धोरणांविषयी फोनवर चर्चा केली. सक्सेना म्हणाले की, दूरध्वनीवर बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या की, राष्ट्रीय स्तरावर लॉकडाउन लादण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लहान कंटेन्मेंट झोन तयार केले जातील, परंतु देशव्यापी लॉकडाउन होणार नाही.

    पंतप्रधान व गृहमंत्र्यांचे परिस्थितीवर बारीक लक्ष

    अर्थमंत्री म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सर्व राज्यांमधील परिस्थितीवर सतत नजर ठेवून आहेत. राज्यात ऑक्सिजन आणि औषधांची कमतरता भासणार नाही. याव्यतिरिक्त लसीकरण अभियानदेखील वेगाने राबवला जात आहे. अर्थमंत्र्यांनी भारतीय लघु मध्यम उद्योग महासंघाच्या अध्यक्षांकडे लघु व मध्यम उद्योगांविषयी माहितीही मागविली. एफआयसीसीआयसह देशभरातील अनेक उद्योग आणि व्यापारी संघटनांनी सरकारला देशव्यापी लॉकडाउन लागू न करण्याची विनंती केली आहे.

    त्यांचे म्हणणे आहे की कोरोना संक्रमणाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या महाराष्ट्र राज्यातही लॉकडाऊनचीच परिस्थिती आहे. याशिवाय दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातही आंशिक लॉकडाउनची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात देशव्यापी लॉकडाउन देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप वाईट असल्याचे सिद्ध होईल.

    FM Nirmala Sitaraman assurance to the business world, there will be no nationwide lockdown

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज