• Download App
    हिमाचल प्रदेशातील धर्मशाळामध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, अनेक घरांत पाणी घुसले, मोटारी वाहून गेल्या|Flood in Dharamshala in Himachal Pradesh caused water to seep into several houses, washed away cars

    हिमाचल प्रदेशातील धर्मशाळामध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, अनेक घरांत पाणी घुसले, मोटारी वाहून गेल्या

    विशेष प्रतिनिधी

    धर्मशाळा : हिमाचल प्रदेशची हिवाळी राजधानी असलेल्या धर्मशाळामधील भागसू नाग भागात सोमवारी सकाळी अचानक ढगफुटी झाल्यामुळे हाहाकार माजला. ढगफुटीनंतर या भागात पुरस्थिती तयार झाली. यानंतर प्रशासनाने शहरी भागात हाय अलर्ट जारी केला आहे.Flood in Dharamshala in Himachal Pradesh caused water to seep into several houses, washed away cars

    पुराचे पाणी शहरातील घरांमध्ये घुसले आहे. त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. पुरात अनेक आलिशान मोटारी वाहून गेल्या आहेत. धर्मशाळेच्या भागसू नाग भागातील ढगफुटी इतकी भयानक होती, की त्यानंतर लगेचच पूर आला.



    पुरामुळे भागसू नाग भागातील छोटे नाले ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. पाण्याची पातळी वाढल्यानं नाल्यांनी नदीचे रुप घेतले आहे. या नाल्यांच्या कडेला असणाऱ्या हॉटेल आणि घरांचे देखील पुराने मोठे नुकसान झाले आहे.

    पुराने धर्मशाळेत हाहाकार माजवला, अनेक वाहनांना जलसमाधी रविवारी रात्री उशिरापासून हिमाचल प्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला, मात्र पुराने मोठ्या प्रमाणात नुकसान केलं.

    मैदानी भागात या दिवसांमध्ये प्रचंड उकाडा असल्यानं अनेक लोक या काळात धर्मशाळाच्या भागसू नाग भागात थांबतात. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गाड्या होत्या. पुराने या सर्व वाहनांचं मोठं नुकसान झाले.

    Flood in Dharamshala in Himachal Pradesh caused water to seep into several houses, washed away cars

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार