• Download App
    उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गंगेचा महापूर ओसरेना, लाखो लोक हवालादिल । Flood condition worsen in UP and Bihar

    उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गंगेचा महापूर ओसरेना, लाखो लोक हवालादिल

    वृत्तसंस्था

    पाटणा : बिहारमध्ये नदीची पाणीपातळी वाढल्याने सुमारे पाच लाख लोकांना फटका बसला आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांची संख्या १५ वरून १६ वर पोचली. तर उत्तर प्रदेशात चोवीस जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. गंगा, यमुनासह अनेक नद्यांची पातळी वाढलेलीच आहे. संगमनगरी प्रयागराज येथे गंगा आणि यमुना नदीची पाणी पातळी वाढलेली असल्याने नदीकाठचा भाग पाण्याखाली गेला आहे. वाराणसीतही गंगा नदीने रौद्र रूप धारण केले आहे. पाणी पातळी वाढल्यानंतर गंगा नदी वाराणसी शहरात वेगवेगळ्या मार्गाने प्रवेश करत आहे. वाराणसीत गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. Flood condition worsen in UP and Bihar



    बिहारमध्ये पाटण्याशिवाय वैशाली, भोजपूर, लखीसराय, मुजफ्फरपूर, दरभंगा, खगडिया, सहरसा, भागलपूर, सारण, बक्सर, बेगुसराय, कटिहार, मुंगेर, समस्तीपूर, पूर्णिया जिल्ह्यातील बहुतांश भाग पूरग्रस्त झाला आहे.

    पूरग्रस्त भागात अत्यावश्य क वस्तू, साहित्याचा पुरवठा केला जात आहे. यासाठी २५८५ नौकांची मदत घेतली जात आहे. गरजेनुसार नौकेची संख्या वाढवण्याची सूचना देण्यात आली आहे. या भागात ६८ मदत छावण्या आणि ६२१ सामूहिक स्वयंपाकघर सुरू केले आहेत. या ठिकाणी काल ६ लाख २८ हजाराहून अधिक नागरिकांनी भोजन केल्याचे म्हटले आहे.

    Flood condition worsen in UP and Bihar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : प. बंगालमध्ये बाबरी मशिदीच्या पायाभरणीचे पोस्टर; TMC आमदार म्हणाले- 6 डिसेंबरला भूमिपूजन; अयोध्येत याच दिवशी वादग्रस्त ढाचा पाडण्यात आला होता

    White House : अफगाण निर्वासिताचा व्हाईट हाऊसजवळ गोळीबार, 2 नॅशनल गार्ड्सची प्रकृती गंभीर

    Delhi High Court, : दिल्ली हायकोर्टाने म्हटले- क्रिकेट सट्ट्यातून कमावलेला प्रत्येक नफा गुन्हा; PMLA कायद्यावर ठेवले बोट