विशेष प्रतिनिधी
पाटणा – बिहार आणि झारखंडमध्ये पुराची स्थिती गंभीर होत आहे. गंगा नदीने रौद्र रूप धारण केल्याने भागलपूर येथे महापुराने थैमान घातले आहे. ५०० पेक्षा अधिक गावांना पाण्याचा वेढा पडला असून तीनशेहून अधिक शाळा पाण्याखाली गेल्या आहेत.Flood condition in Bihar and Zarkhand worsen
राष्ट्रीय महामार्ग ३१ वर पुन्हा पाणी आले आणि काही ठिकाणी रस्त्याच्या खालचा भाग खचला. त्यामुळे वाहतूक थांबवण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग ३१ हा उत्तर, बिहार राज्यातून बंगालकडे जातो. हा मार्ग बंद केल्याने भागलपूरचा पूर्णिया, कटिहार आदी शहराशी असलेला थेट संपर्क तुटला आहे.
पाटण्याहून भागलपूरमार्गे झारखंडच्या साहिबगंजकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग-८० वरील वाहतूक आठवड्याभरापासून बंदच आहे. सुलतानगंजपासून कहलगाव यादरम्यान एक डझनभर ठिकाणी एनएन-८० मार्गावर पाणी आले आहे. भागलपूरहून पूर्व आणि पश्चिामेकडे जाण्यासाठी आज सहाव्या दिवशीही रेल्वे वाहतूक बंद होती.
भागलपूर येथे स्थिती चिंताजनक असून नऊ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातील शंभरपेक्षा अधिक राज्य महामार्गावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प पडली आहे.
भागलपूरमध्ये शहराबरोबरच ग्रामीण भागात पाणीपातळी वाढू लागली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.
Flood condition in Bihar and Zarkhand worsen
महत्वाच्या बातम्या
- विज्ञानाची गुपिते : झाडातील विशिष्ठ् ग्रंथीमुळेच फुलांना येतो सुगंध
- महिला, मुलांवर क्रूर अत्याचार करणाऱ्या तालिबानला काही जणांचा निर्लज्जपणे पाठिंबा – योगी आदित्यनाथ यांची टीका
- अवघ्या एका नागरिकाला घेऊन रुमानियाचे विमान मायदेशी परतले
- नेपाळच्या राजकारणात भूकंप, विरोधी कम्युनिस्ट पक्षात उभी फूट
- शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास थांबवण्याचा सीबीआयचा निर्णय़, न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल