विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाने गेल्या चोवीस तासात केलेल्या कारवाईत पाच दहशतवादी मारले गेले. मृत दहशतवाद्यांत लष्करे तय्यबाचे दोन आणि हिज्बुल मुजाहिदीनचा एका कमांडरचा समावेश आहे.Five terrorist killed in J and K
दरम्यान. बडगाम पोलिसांनी लष्करे तय्यबाच्या दहशतवाद्याला अटक केली असून त्याच्याकडून स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दानिश अहमद दार असे त्याचे नाव असून तो सारी सिंघपोरा पट्टण येथील रहिवासी आहे.
पुलवामात रात्री चकमक सुरू झाली. घटनास्थळी दोन दहशतवादी असल्याच्या संशयावरून लष्कर आणि पोलिसांनी परिसराला वेढा घातला होता. पुलवामातील पुछाल भागात दहशतवादी लपल्याचे पोलिसांना कळाले होते.
यादरम्यान घरात दडून बसलेल्या लष्करे तय्यबाच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. यावेळी लष्कराने त्यांना शरण येण्याचे आवाहन केले होते. शस्त्र ठेवण्याचे दहशतवाद्यांना सांगण्यात आले. परंतु त्यास दहशतवाद्यांनी प्रतिसाद दिला नाही. याउलट त्यांनी गोळीबार सुरू केला. यात दोन दहशतवादी ठार झाले.
तत्पूर्वी कुलगाम पोलिस आणि आरआरच्या जवानांनी कुलगामच्या झोदार भागात केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले. तत्पूर्वी हंडवाडा येथे सुरक्षा दलाने हिज्बुलचा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाईला ठार केले होते.
Five terrorist killed in J and K
महत्त्वाच्या बातम्या
- Gokul Milk Price : गोकुळ दुधाच्या दरात वाढ, 11 जुलैपासून लागू होणार नवे दर
- महाराष्ट्र आणि केरळच देशापुढील सर्वात मोठा धोका, कोरोना रुग्णांची संख्या कमी होईना
- संभाव्य तिसऱ्या लाटेविरुध्द जय्यत तयारी, देशभरात १५०० हून अधिक ऑक्सिजन प्लांट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती
- नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाची धुरा ज्योतिरदित्य शिंदेंवर, विमानतळांची नावे बदलण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या न्यायालयाच्या सूचना
- कडकनाथ कोंबडीने वाढते रोग प्रतिकारक शक्ती, कडकनाथ रिसर्च सेंटरचा अजब दावा