• Download App
    खळबळजनक : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींना जीवे मारण्याची धमकी! Five Justices of the Karnataka High Court received death threats

    खळबळजनक : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींना जीवे मारण्याची धमकी!

     फोन करणारा म्हणाला ५० लाख द्या नाहीतर…

    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. फोन करणाऱ्यांनी ५० लाखांची खंडणी द्या, अन्यथा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. कर्नाटक न्यायालयाच्या जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) यांना व्हॉट्सअॅपवर याबाबत कॉल आला होता. घटनेची माहिती मिळताच कर्नाटक पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. Five Justices of the Karnataka High Court received death threats

    कॉलरचा नंबर पाकिस्तानी असून व्हॉट्सअॅपवर पाठवलेले खातेही पाकिस्तानी बँकेचे असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. फोन करणार्‍याने पाकिस्तानच्या (AVL) अलाईड बँक लिमिटेडचा खाते क्रमांक पाठवला आणि त्यात लवकरात लवकर पैसे जमा करा, अन्यथा दुबईची टोळी न्यायाधीशांना लक्ष्य करत आहे असे सांगितले आहे. पीआरओसोबत काही नंबरही शेअर केले, ज्यात आरोपींनी सांगितले की हे त्यांच्या भारतीय शूटर्सचे नंबर आहेत.

    उर्दू, इंग्रजी आणि हिंदीमध्ये संदेश पाठवले –

    मिळालेल्या माहितीनुसार, हे मेसेज तीन भाषांमध्ये पाठवण्यात आले होते. पीआरओने दिलेल्या जबाबात पोलिसांना सांगण्यात आले आहे की, काही दिवसांपूर्वी त्यांना एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन आला तेव्हा ते न्यायालयात हजर होते. पहिल्या आरोपीने सुमारे 5 न्यायाधीशांची नावे सांगितली आणि त्या न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच लवकर पैसे देण्यास सांगितले.

    Five Justices of the Karnataka High Court received death threats

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!