वृत्तसंस्था
बंगळुरू : कोरोना प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर एक सकारात्मक बातमी आली आहे. महिला मिलिटरी पोलिसांची पहिली अधिकाऱ्यांची बॅच लष्कराच्या सेवेत आज दाखल करण्यात आली आहे.First batch of women Military Police inducted into the Indian Army.
बंगळुरूच्या कॉर्प्स ऑफ मिलिटरी पोलीस अँड स्कूलच्या द्रोणाचार्य परेड ग्राऊंडवर खास संचलन झाले. त्यामध्ये ८३ महिला पोलीस अधिकाऱ्यांना भारतीय लष्कराच्या सेवेत सामावून घेऊन त्यांना विविध ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या.
लष्कराच्या सेवेत महिलांच्या भूमिकेविषयी वाद सुप्रिम कोर्टापर्यंत गेले आहेत. पण अनेक वादांवर तोडगे काढून महिलांना भारतीय लष्कराच्या सेवेत संधी देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मिलिटरी पोलीसांच्या सेवेत महिलांचा समावेश झाल्याने एक नवा अध्याय सुरू झाल्याची भावना या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.लष्कराच्या सेवेत महिला अधिकारी आणि सैनिक मोलाची कामगिरी बजावत आहेत.
त्यांच्यावर अनेकदा विशेष जोखमीची कामगिरी सोपविली गेली आहे. त्यांनी ती अतिशय सक्षमपणे पार पाडली आहे.आताही मिलिटरी पोलीसांमध्ये महिला यापुढे अधिक सक्षमपणे सक्रीय भूमिका बजावू शकतील, असा विश्वास महिला अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
First batch of women Military Police inducted into the Indian Army.