• Download App
    चित्रकूट कारागृहात शार्प शुटरने केला अंधाधुंद गोळीबार, चकमकीत तीन कैदी ठार Firing in chitrakut central jail in UP

    चित्रकूट कारागृहात शार्प शुटरने केला अंधाधुंद गोळीबार, चकमकीत तीन कैदी ठार

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ – उत्तर प्रदेशातील चित्रकूट मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षात एका कैद्याने इतर दोन बंदींचा खून केला. तुरुंगाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात खुनी कैद्याला ठार केले. Firing in chitrakut central jail in UP

    तुरुंगातील काही कैद्यांमध्ये आपापसांत झटापट झाली. सीतापूरचा शार्प शूटर अंशुल दीक्षितने वसीम काला आणि मीराजुद्दीन यांच्यावर बंदुकीतून बेछूट गोळीबार केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात येईपर्यंत अंशुलने दोघांवर गोळ्यां चा अक्षरशः वर्षाव केला. यात वसीम आणि मीराजुद्दीन जागीच ठार झाले. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अंशुलला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. पण त्याने त्यांच्यावरही गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्याला ठार केले.



    कैद्यांमधील झटापट सोडविण्यासाठी गेलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याकडील बंदूक हिसकावून अंशुलने दोघांवर गोळीबार केला, असे त्रिपाठी यांनी सांगितले. शार्प शूटर अंशुलला गोरखनाथ जिल्ह्यातून २०१४ मध्ये अटक झाली होती. पश्चियम उत्तर प्रदेशमधील गुंड वसीम काला याला सहारनपूर तुरुंगातून आणि पूर्वांचलमधील मुख्तार टोळीतील गुंड मीराजुद्दिन याला बनारसहून चित्रकूट तुरुंगात आणले होते.

    Firing in chitrakut central jail in UP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!