• Download App
    राजस्थानातील व्याघ्र अभ्यारण्यात भीषण आग: वणव्याने जनावरे गावांच्या दिशेने आल्याने तारांबळ । Fire at Sariska Forest in Rajasthan; animals ran towards villages

    राजस्थानातील व्याघ्र अभ्यारण्यात भीषण आग: वणव्याने जनावरे गावांच्या दिशेने आल्याने तारांबळ

    वृत्तसंस्था

    जयपूर : राजस्थानच्या जंगलात भीषण वणवा लागल्याने प्राणी जिवाच्या आकांताने गावांकडे धाव घेत असल्याने गावकरी संकटात सापडले आहे. दरम्यान आगा आटोक्यात आणण्यासाठी;लष्कराची हेलिकॉप्टर मागविली आहेत. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील सरिस्का व्याघ्र अभयारण्यामध्ये रविवारी भीषण आग लागली. Fire at Sariska Forest in Rajasthan; animals ran towards villages



    सरिस्का डोंगरात ही आग लागल्यामुळे प्राणीही त्रस्त झाले असून ते गावाकडे धाव घेत आहेत. प्रशासन सतर्क झाले आहे. पोलिसांचे पथक लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देत आहे.

    पृथ्वीपुरा-बालेटा गावाशेजारच्या जंगलात लागलेली ही आग पाहता पाहता कित्येक कमीपर्यंत पसरली. आग लागल्याची माहिती मिळताच सिव्हिल डिफेन्सचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि ग्रामस्थांच्या मदतीने आठ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतू पुन्हा सोमवारी दुपारी आग भडकली आणि आता ती डोंगररांगांमध्ये पसरली आहे.

    Fire at Sariska Forest in Rajasthan; animals ran towards villages

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार