Wednesday, 7 May 2025
  • Download App
    बदायूंतील काझीच्या अंत्ययात्रेत कोरोना नियमांची पायमल्ली, प्रचंड गर्दीचा व्हिडिओ व्हायरल, अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल । FIR registered against unidentified people for violating COVID protocols in Budaun in UP

    बदायूंतील काझीच्या अंत्ययात्रेत कोरोना नियमांची पायमल्ली, प्रचंड गर्दीचा व्हिडिओ व्हायरल, अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

    FIR registered against unidentified people for violating COVID protocols in Budaun in UP

    COVID protocols : येथील मुस्लिम समाजाचे धार्मिक नेते काझी शेख अब्दुल हमीद मुहम्मद सालिमुल काद्री बदायूंनी यांचे रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला चाहत्यांची अलोट गर्दी उसळली. यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. या अंत्ययात्रेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. FIR registered against unidentified people for violating COVID protocols in Budaun in UP


    वृत्तसंस्था

    बदायूं (उत्तर प्रदेश) : येथील मुस्लिम समाजाचे धार्मिक नेते काझी शेख अब्दुल हमीद मुहम्मद सालिमुल काद्री बदायूंनी यांचे रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला चाहत्यांची अलोट गर्दी उसळली. यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. या अंत्ययात्रेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

    रविवारी काजी अब्दुल हमीद मोहम्मद सलीमुल काद्री यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समाजात हजारोंच्या संख्येने लोकांनी त्यांच्या अंत्ययात्रेला गर्दी केली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या अंत्ययात्रेच्या व्हिडिओमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे. याशिवाय या अंत्ययात्रेतील सहभागींनी मास्कही घातलेले नसल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.

    पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा म्हणाले, “कोविड प्रोटोकॉल तोडण्यासाठी आणि मिरवणुकीत मोठ्या संख्येने जमा झाल्याबद्दल अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे. भादंवि 188, महामारी कायदा आणि भादंविच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ते म्हणाले की, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि मिरवणुकीच्या व्हिडीओ फुटेजच्या साहाय्याने आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

    निधन झालेल्या काझींची प्रकृती अनेक दिवसांपासून खालावलेली होती. रविवारी पहाटे 03.41 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त पाहता पाहता सोशल मीडियावर पसरले. यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली. गर्दी एवढी मोठी होती की, पोलीस व प्रशासनाने वारंवार सामजिक अंतर राखण्याचे आवाहन करूनही त्याचे पालन झाले नाही.

    FIR registered against unidentified people for violating COVID protocols in Budaun in UP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानात घुसून 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले; Operation sindoor ही तर सुरुवात, अजून बरेच काही बाकी!!

    Operation sindoor : जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचा मिसाईल हल्ले!!

    Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!

    Icon News Hub