• Download App
    संपूर्ण देशात लॉकडाऊन? जाणून घ्या, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ल्ड बँकेला काय सांगितले! । Finance Minister Nirmala Sitharaman on Lockdown across the country meeting With World Bank

    संपूर्ण देशात लॉकडाऊन? जाणून घ्या, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ल्ड बँकेला काय सांगितले!

    Finance Minister Nirmala Sitharaman : मागच्या 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 2 लाखांपर्यंत आढळल्यानंतर देशात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागते की काय, अशी भीती सर्वसामान्यांना वाटत आहे. लॉकडाऊनच हा संसर्ग रोखण्यचा एकमेव मार्ग आहे का? असा सवालही उपस्थित होत आहे. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जागतिक बँकेला सांगितले आहे की, मोदी सरकार गतवर्षाप्रमाणे पूर्ण लॉकडाऊनच्या विचारात नाही, यावेळी स्थानिक कंटेन्मेंट झोनमध्येच निर्बंध लादले जात आहेत. Finance Minister Nirmala Sitharaman on Lockdown across the country meeting With World Bank


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मागच्या 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 2 लाखांपर्यंत आढळल्यानंतर देशात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागते की काय, अशी भीती सर्वसामान्यांना वाटत आहे. लॉकडाऊनच हा संसर्ग रोखण्यचा एकमेव मार्ग आहे का? असा सवालही उपस्थित होत आहे. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जागतिक बँकेला सांगितले आहे की, मोदी सरकार गतवर्षाप्रमाणे पूर्ण लॉकडाऊनच्या विचारात नाही, यावेळी स्थानिक कंटेन्मेंट झोनमध्येच निर्बंध लादले जात आहेत.

    मंगळवारी वर्ल्ड बँक समूहाचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांच्याशी झालेल्या व्हर्च्युअल मीटिंगमध्ये सीतारामन म्हणाल्या की, देशभरात सध्या संपूर्ण लॉकडाउनची आवश्यकता नाही. बुधवारी देशातील कोरोनाचे 1.84 लाख रुग्ण आढळले, तर एका दिवसात एक हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वात वाईट परिस्थिती असलेल्या महाराष्ट्रात आज रात्री 8 वाजेपासून 15 दिवस लॉकडाऊनसदृश निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत.

    अर्थ मंत्रालयाने ट्वीट केले की, “अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेला रोखण्यासाठी भारत उचलण्यात आलेली पावले शेअर केली आहेत. यात टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, लसीकरण आणि कोविड अ‍ॅप्रोपिएट बिहेव्हिएर यांचा समावेश आहे.”

    सीतारामन म्हणाल्या की, “दुसरी लाट असूनही आम्ही हे स्पष्ट केले आहे की मोठ्या प्रमाणात लॉकडाउन होणार नाही. आम्हाला अर्थव्यवस्थेला पूर्णपणे ठप्प करायचे नाही. स्थानिक पातळीवर रुग्णांना विलगीकरण करून या समस्येचा सामना केला जाईल. लॉकडाऊन होणार नाही.’

    जागतिक बँकेच्या निवेदनानुसार, मालपास आणि अर्थमंत्री सीतारामन यांनी नागरी सेवा आणि वित्तीय क्षेत्रातील सुधारणा, जलसंपदा व्यवस्थापन आणि आरोग्य सेवेवर चर्चा केली. कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना आणि लसीच्या उत्पादन क्षमतेवरही यावेळी चर्चा झाली.

    Finance Minister Nirmala Sitharaman on Lockdown across the country meeting With World Bank

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज