पुढील काही दिवस प्रतिक्षा करावी आणि थांबावे, अशी विनंती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोनामुळे परिणाम झालेल्या उद्योग क्षेत्राला सरकारच्या सहकार्याचे आश्वासन दिले आहे.Finance Minister Nirmala Sitharaman assures cooperation to industry
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पुढील काही दिवस प्रतिक्षा करावी आणि थांबावे, अशी विनंतीकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोनामुळे परिणाम झालेल्या उद्योग क्षेत्राला सरकारच्या सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
उद्योग संघटना फिक्कीसोबत झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत निर्मला सीतारमण म्हणाल्या की, उद्योग क्षेत्राने या परिस्थितीवर बारीक नजर ठेवावी, असे आम्हाला वाटते. या कोरोना साथीच्या विरोधात लढा देण्यासाठी सरकार आणि उद्योग क्षेत्र सोबत आहेत.
नवीन लसीकरण मार्गदर्शक तत्त्वांसोबत आणखी कोरोना प्रकरणांत चाचणी, ट्रॅक, उपचार, कोविड-१९ प्रोटोकॉल आणि लसीकरणामध्ये पाचपट अधिक धोरण अवलंबले गेले आहे. यामुळे येणाºया काळात दिलासा मिळेल.
या तिमाहीच्या मूल्यांकनापूर्वी आणखी काही दिवस आधी परिस्थिती अतिशय काळजीपूर्वक समजून घ्या,असे आवाहन करून सीतारामन म्हणाल्या, कोरोनाच्या सुरूवातीपासूनच हॉस्पिटेलिटी, हवाई वाहतूक, पर्यटन आणि हॉटेल्स यासारख्या क्षेत्रांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे सरकारने आपत्कालीन क्रेडिट लाईन गॅरंटी योजनेतही या क्षेत्रांचा समावेश केला आहे. ऑक्सिजनची वैद्यकीय मागणी पूर्ण होताच औद्योगिक घटकांना ऑक्सिजनचा पुरवठादेखील सुरू होईल.
Finance Minister Nirmala Sitharaman assures cooperation to industry
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी रद्द केल्या उद्या होणाऱ्या बंगालमधील सर्व सभा, कोरोना परिस्थितीवर घेणार उच्चस्तरीय बैठक
- अनास्थेचा परिणाम : जानेवारीतच केंद्राने कोरोना लाटेचा राज्यांना दिला होता इशारा, दुर्लक्षामुळे महामारीचा झाला उद्रेक
- ‘जिथे कमी तिथे आम्ही’ : ऑक्सिजनसाठी कॉर्पोरेट- सरकारी कंपन्यांचा पुढाकार, टाटा-रिलायन्ससह अनेक कंपन्या मैदानात
- ‘या पापी समाजाचा भाग असल्याची लाज वाटते’ म्हणत न्यायालयानेदेखील महाराष्ट्र सरकारपुढे टेकले हात
- पाकिस्तानात चिनी राजदूत थांबलेल्या हॉटेलमध्ये तेहरिक ए तालिबानकडून बॉम्बस्फोट, ४ जण ठार, १२ जखमी