• Download App
    अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि नायका कंपनीच्या सीईओ फाल्गुनी नायर यांचा फोर्ब्ज मॅगझीनच्या जगातील सर्वात प्रभावशाली 100 महिलांमध्ये समावेश | Finance Minister Nirmala Sitharaman and Nayaka CEO Falguni Nair are among Forbes Magazine's 100 Most Influential Women in the World

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि नायका कंपनीच्या सीईओ फाल्गुनी नायर यांचा फोर्ब्ज मॅगझीनच्या जगातील सर्वात प्रभावशाली 100 महिलांमध्ये समावेश

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : फोर्ब्ज मॅगझीन द्वारा यावर्षीच्या जगातील सर्वात प्रभावशाली 100 महिलांची लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारताच्या दोन प्रभावशाली स्त्रियांचा समावेश आहे. एक म्हणजे भारतीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि नायका कंपनीच्या सीईओ आणि फाउंडर फाल्गुनी नायर.

    Finance Minister Nirmala Sitharaman and Nayaka CEO Falguni Nair are among Forbes Magazine’s 100 Most Influential Women in the World

    निर्मला सीतारामन यांनी सलग तिसऱ्या वर्षी या यादीत येण्याचा मान मिळविला आहे. 2020 मध्ये निर्मला सीतारमण यांनी 41 वा नंबर या यादीत पटकावला होता. तर 2019 मध्ये 34 व्या स्थानावर होत्या. तर ह्या वर्षी 2021 मध्ये त्या 31व्या स्थानावर आहेत. निर्मला सीतारामन या भारताच्या पहिल्या फुल टाईम अर्थमंत्री आहेत. त्यांनी राजकीय करिअर सुरू करण्याच्या आधी यूकेस्थित एका अॅग्रीकल्चर इंजिनीअर्स असोसिएशन मध्ये काम केले होते. त्याचप्रमाणे बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसेसमध्ये देखील त्यांनी काम केले होते. त्या नॅशनल कमिशन फॉर वुमेनच्या देखील सदस्या होत्या. त्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये आपली कारकीर्द सुरू केली आहे.


    औरंगाबाद:औरंगाबादच्या राष्ट्रीय बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण ! जनधन-आधार-मोबाइल लिंकिंग ठरताय गेम चेंजर ; भागवत कराडांचेही कौतुक


    तर फाल्गुनी नायर या यादीत 88 व्या स्थावर आहेत. आपला ड्रीम बिझनेस चालू करण्यासाठी त्यांनी आपला हाय सॅलरी जॉब सोडला होता. 2012 मध्ये त्यांनी नायका ही कंपनी चालू केली आहे. या कंपनीतर्फे एकूण 1350 प्रोडक्ट ऑनलाईन आणि ऑफलाईन विकले जातात. नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांना सेल्फ मेड, सर्वात श्रीमंत, उद्योजिका हा अवॉर्ड देखील देण्यात आला होता.

    बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी ह्या यादीमध्ये 43 वा क्रमांक पटकावला आहे.

    Finance Minister Nirmala Sitharaman and Nayaka CEO Falguni Nair are among Forbes Magazine’s 100 Most Influential Women in the World

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!