• Download App
    रामदेवबाबांवर गुन्हा दाखल करा, ते टीका करतात स्वतःवर पण वेळ आली की ॲलोपॅथीचे उपचार घेतात| File case against ramdevbaba

    रामदेवबाबांवर गुन्हा दाखल करा, ते टीका करतात स्वतःवर पण वेळ आली की ॲलोपॅथीचे उपचार घेतात

     

    नवी दिल्ली : ॲलोपॅथी उपचारांवर टीका करणे योगगुरू रामदेवबाबा यांना चांगलेच महागात पडले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणारे पत्र इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना लिहले आहे. File case against ramdevbaba

    मध्यंतरी रामदेवबाबा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता त्यात ॲलोपॅथी उपचारांची खिल्ली उडवितानाच त्यांनी लोकांच्या मृत्यूला देखील हीच उपचारपद्धती कारणीभूत असल्याचा आरोप होता.



    काही अॅलोपॅथी औषधांना देखील त्यांनी आक्षेप घेतला होता.रामदेवबाबा यांनी आधीच डॉक्टरांना खुनी ठरविले होते. ते लोकांना एक सांगतात पण स्वतः मात्र रामदेव, बालकृष्ण हे ॲलोपॅथीचे उपचार घेतात.

    रामदेवबाब यांच्या वक्तव्यांचा लोकांवर विपरीत परिणाम होत आहे.रामदेवबाबांमुळे हजारो लोकांचे प्राण संकटामध्ये जात आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांची गंभीर दखल घेतली पाहिजे असे आयएमएचे म्हणणे आहे.

    रामदेव यांच्यावर साथरोग कायद्यान्वये गुन्हा दाखल करा किंवा त्यांच्या आरोपांचा स्वीकार करत सर्व अत्याधुनिक अॅलोपॅथी उपचार केंद्रे बंद करा.’ अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.

    File case against ramdevbaba

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये