राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर सर्व आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमधून पुढील सूचना मिळेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे , अशी घोषणा FIFA ने सोमवारी UEFA सह संयुक्त निवेदनात केली आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम आता वेगवेगळ्या क्षेत्रात उमटत आहेत. फिफाने रशियाच्या फुटबॉल संघावर कारवाई करत त्यांना वर्ल्डकप मधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे.FIFA and UEFA suspend Russia from international football
तसेच रशियाच्या फुटबॉल संघाला सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यामधून बाहेर काढण्याचा निर्णय फिफा तसेच UEFA ने घेतला आहे.
UEFA ने ही कारवाई करत या चॅम्पियन लिगची स्पॉन्सर असलेली रशियन कंपनी गॅझप्रोमशी असलाला आपला सर्व करार संपवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी फिफा आणि UEFA ने हा निर्णय जाहीर केला आहे. पुढील सूचना येईपर्यंत ही बंदी कायम असेल असं या दोन्ही संघटनांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
प्रसिद्ध फुटबॉल स्पर्धा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्याचं ठिकाण या युद्धामुळे बदलण्यात आलं आहे. आधी या स्पर्धेचा अंतिम सामना रशियातील प्रसिद्ध फुटबॉल स्टेडियम सेंट पीटर्सबर्ग येथे होणार होता. पण आता हे ठिकाण बदलून पॅरिस करण्यात आलं आहे.
दरम्यान, रशिया आणि युक्रेन युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. गेल्या चार तासांपासून बेलारुसच्या सीमेवर रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाची बैठक सुरु आहे. या बैठकीत युक्रेननं राजधानी कीव्हसह डोनबास आणि क्रीमियातून रशियन सैन्य हटवण्याची मागणी केली आहे. रशियानं तातडीने शस्त्रसंधी करावी अशी मागणी झेलेन्स्की यांनी केलीय. त्यामुळे आता बेलारुसमध्ये होणाऱ्या बैठकीत काय होणार? रशिया-युक्रेन युद्ध संपणार का याकडं जगाचं लक्ष लागलंय.
FIFA and UEFA suspend Russia from international football
महत्त्वाच्या बातम्या
- SEBI : SEBI सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाची कमान ‘ ती ‘ च्या हातात ! कोण आहेत SEBI च्या नव्या अध्यक्षा माधवी पुरी बुच? जाणून घ्या सविस्तर
- Ukraine Russia War : झेलेन्स्कींची कैद्यांना ऑफर- “रशियाविरोधात लढणार असाल तर तुरुंगातून होईल सुटका”…
- मोदीद्वेषात आंधळ्या कॉँग्रेसला समजेना युक्रेन-रशिया संबंधांवर काय घ्यावी भूमिका, आनंद शर्मा- शशी थरुर यांची वेगवेगळ्या दिशेला तोंडे
- एनसीबीमध्ये आता खास श्वान दल, अंमली पदार्थ शोधण्यासाठी स्थापन केले जाणार श्वान दल, ७० प्रशिक्षित कुत्र्यांचा समावेश