• Download App
    अभिनेता विरुध्द फॅशन डिझायनर, शत्रूघ्न सिन्हा यांच्याविरुध्द भाजपाच्या अग्निमित्रा पॉल|Fashion designer Agnimitra Paul against actor Shatrughan Sinha

    अभिनेता विरुध्द फॅशन डिझायनर, शत्रूघ्न सिन्हा यांच्याविरुध्द भाजपाच्या अग्निमित्रा पॉल

    विशेष प्रतिनिधी

    कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून तृणमूल कॉँग्रेसने ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपने फॅशन डिझायनर असलेल्या महिला आघाडीच्या नेत्या अग्निमित्रा पॉल यांना उभे केले आहे.Fashion designer Agnimitra Paul against actor Shatrughan Sinha

    पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करताना भाजपने पक्षाच्या आमदार अग्निमित्रा पॉल यांना आसनसोल लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पॉल यांची लढत पटना साहिबचे माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी असणार आहे.



    शत्रुघ्न सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.शत्रुघ्न सिन्हा यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक पटनामधून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. त्यावेळी भाजपच्या रविशंकर प्रसाद यांनी त्यांन पराभूत केलं होतं.

    अभिनेते आणि राजकारणी असलेले सिन्हा त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये गेले. सध्या ते आसनसोल मतदार संघाचे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आहेत.अग्निमित्रा पॉल या एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर असून, 2021 च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत आसनसोल दक्षिण विधानसभा मतदार संघात त्यांनी तृणमूलच्या सयानी घोष यांचा पराभव केला होता.

    शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारख्या बाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्याने आसनसोल मतदारसंघात नाराजी आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एका बाजुला आमार बांगला म्हणत असताना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला संधी देण्याऐवजी बाहेरून आलेल्याला उमेदवारी दिल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांत नाराजी आहे.

    Fashion designer Agnimitra Paul against actor Shatrughan Sinha

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’