• Download App
    फारुख अब्दुल्लांचे भडकाऊ आवाहन, कृषि कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांप्रमाणे जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा परत मिळविण्यासाठी आंदोलन|Farooq Abdullah's provocative appeal, agitation for restoration of special status of Jammu and Kashmir like farmers protesting against agricultural laws

    फारुख अब्दुल्लांचे भडकाऊ आवाहन, कृषि कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांप्रमाणे जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा परत मिळविण्यासाठी आंदोलन

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा भडकाऊ आवाहन केले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या लोकांना राज्याचा दर्जा आणि विशेष दर्जा परत मिळवण्यासाठी कृषी कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांप्रमाणे त्याग करावा लागेल, असे आवाहन फारुख अब्दुल्ला यांनी रविवारी केले.Farooq Abdullah’s provocative appeal, agitation for restoration of special status of Jammu and Kashmir like farmers protesting against agricultural laws

    नसीमबाग येथे पक्षाचे संस्थापक शेख मोहम्मद अब्दुल्ला यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त एनसीच्या युवा शाखेच्या अधिवेशनाला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांचा पक्ष हिंसेला पाठिंबा देत नाही, असे सांगत अब्दुल्ला म्हणाले, शेतकऱ्यांनी ११ महिन्यांपेक्षा जास्त काळ आंदोलन केले.



    ७०० हून अधिक शेतकरी मरण पावले. शेतकऱ्यांनी बलिदान दिल्यावर केंद्राला तीन कृषी कायदे मागे घ्यावे लागले. शेतकºयांप्रमाणेच आपले हक्क परत मिळवण्यासाठी आपल्यालाही असाच त्याग करावा लागेल. आपण कलम ३७०, ३५-अ परत मिळवण्याचे वचन दिले आहे आणि त्यासाठी आम्ही कोणताही त्याग करण्यास तयार आहोत, हे लक्षात ठेवा.

    कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटन वाढले आहे, या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत, अब्दुल्ला म्हणाले की केंद्रशासित प्रदेशाचा प्रश्न येतो तेव्हा पर्यटन हेच सर्व काही असल्यासारखं मंत्री बोलतात.

    मात्र, रोजगाराचं काय? तुम्ही ५०,०० नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, त्या कुठे आहेत? उलट तुम्ही आमच्या लोकांना संपवत आहात. तुम्ही पंजाब आणि हरियाणातील लोक जम्मू आणि काश्मीरमध्ये बँकेत नोकरीसाठी आणत आहात, इथं लोक नव्हते का?

    Farooq Abdullah’s provocative appeal, agitation for restoration of special status of Jammu and Kashmir like farmers protesting against agricultural laws

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    मोदी + राजनाथ + जयशंकर उच्चस्तरीय बैठक, Operation sindoor अजून सुरूच, भारतीय हवाई दलाचा स्पष्ट खुलासा!!

    Monsoon : मान्सून 4 दिवस आधी 27 मे रोजी केरळात पोहोचण्याची शक्यता; 16 वर्षांनंतर अपेक्षेपेक्षा लवकर येण्याचा अंदाज

    IMF gave Pakistan : IMFने पाकला दिले 12 हजार कोटींचे कर्ज; भारताने म्हटले- दहशतवादाला निधी देणे धोकादायक