• Download App
    Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चाचे पंतप्रधान मोदींना पत्र, पुन्हा चर्चा सुरू करण्याचे आवाहन । Farmers Protest Now Samyukt Kisan Morcha Writes Letter To PM Modi To Start Talks Again On Farm Laws Issue

    Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चाचे पंतप्रधान मोदींना पत्र, पुन्हा चर्चा सुरू करण्याचे आवाहन

    Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृषी कायद्यांबद्दल सरकारशी चर्चा करण्यासाठी पत्र लिहिले आहे. यात मोर्चाने म्हटले की, सरकारने पुन्हा चर्चा सुरू केली पाहिजे. तसेच सरकारने आमच्या मागण्या मान्य करून तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, असेही यात म्हणण्यात आले आहे. Farmers Protest Now Samyukt Kisan Morcha Writes Letter To PM Modi To Start Talks Again On Farm Laws Issue


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृषी कायद्यांबद्दल सरकारशी चर्चा करण्यासाठी पत्र लिहिले आहे. यात मोर्चाने म्हटले की, सरकारने पुन्हा चर्चा सुरू केली पाहिजे. तसेच सरकारने आमच्या मागण्या मान्य करून तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, असेही यात म्हणण्यात आले आहे.

    या पत्राद्वारे किसान मोर्चाने सांगितले की, 26 मे रोजी दिल्लीच्या सीमेवरील आमच्या आंदोलनाला सहा महिने पूर्ण होतील. यादरम्यान आम्ही आमचा संघर्ष सुरू ठेवला आहे. याच दिवशी मोदी सरकारचीही सात वर्षे पूर्ण होतील. शेतकरी संघटना हा दिवस काळा दिवस म्हणून पाळणार आहेत. किसान मोर्चाने म्हटले की, सरकारशी चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्या. असे असूनही आंदोलक शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. 22 जानेवारी 2021 पासून सरकारने संवादाचे दरवाजे बंद केले. आंदोलनात आम्ही 470 साथीदार गमावले.

    पत्रात किसान मोर्चाने असेही म्हटले की, कोरोना महामारी असूनही देशातील अन्नदाता अर्ध्या वर्षापासून रस्त्यावर राहण्यास मजबूर आहे. तीन कृषी कायदे मागे घ्यावेत आणि एमएसपीला कायदेशीर हमी देण्यात यावी या मागणीवर आम्ही ठाम आहोत. तसेच या पत्राद्वारे सरकारकडून अशीही मागणी करण्यात आली आहे की, सरकारने कोरोनाच्या लढाईत आपली सर्व शक्ती व संसाधने लावावीत, कारण आता ही महामारी गावातही पसरत आहे. सर्वांना सहा महिन्यांत लस विनामूल्य दिली जावी. गरजू लोकांना रेशन मिळायला हवे, कोरोनातील सर्व रुग्णांना मोफत उपचार केले जावे. राजकीय इच्छाशक्ती असल्यास हे सर्व शक्य आहे.

    शेतकरी आंदोलनातही कोरोनाचा संसर्ग

    दरम्यान, शेतकरी आंदोलनात कोरोनाचा संसर्ग पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकताच दोन आंदोलक शेतकऱ्यांचा कोरोना संसर्गानंतर मृत्यू झाला होता. यापूर्वी आंदोलनात सहभागी एका तरुणीवर बलात्काराचेही प्रकरण ताजे आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणीचा मृत्यूही कोरोना संसर्गाने झाला. मृत्यूपूर्वी तिने आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराची माहिती दिल्याने ही घटना समोर आली होती.

    Farmers Protest Now Samyukt Kisan Morcha Writes Letter To PM Modi To Start Talks Again On Farm Laws Issue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!