• Download App
    Tokyo Paralympics 2020 : भालाफेकीतले दोन्ही “सुवर्ण वीर” हरियाणाचेच सुपुत्र; पानिपतच्या नीरजनंतर सोनिपतच्या सुमितची ऐतिहासिक कामगिरी|Family members & friends of para javelin thrower Sumit Antil celebrate by dancing in Haryana's Sonipat

    Tokyo Paralympics 2020 : भालाफेकीतले दोन्ही “सुवर्ण वीर” हरियाणाचेच सुपुत्र; पानिपतच्या नीरजनंतर सोनिपतच्या सुमितची ऐतिहासिक कामगिरी

    • भालाफेकीत जागतिक विक्रमासह सुवर्ण पदक जिंकणाऱ्या सुमित अँटीलच्या सोनिपतमध्ये जल्लोष  Family members & friends of para javelin thrower Sumit Antil celebrate by dancing in Haryana’s Sonipat

    वृत्तसंस्था

    टोकियो – टोकिया पॅराऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूने दुसरे सुवर्ण पदक जिंकून मोठा पराक्रम गाजविला आहे. सुमित अँटील याने भालाफेकीत जागतिक विक्रमासह सुवर्ण पदक जिंकून भारताची मान जगात उंचवली आहे. (Sport Class F64) मध्ये त्याने तब्बल ६८.५५ मीटर अंतरावर भाला फेक करून सुवर्ण पदकावर भारताचे नाव कोरले आहे.

    सुमित मूळचा हरियाणातील सोनिपतचा आहे. त्याच्या रूपाने हरियाणाच्या दुसऱ्या सुपुत्राने ऑलिपिंकमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. टोकियो ऑलिपिंकमध्ये हरियाणाच्या पानिपतमधील नीरज चोप्राने भालाफेकीतच भारताला सुवर्ण पदक मिळवून देऊन ऐतिहासिक कामगिरी केली आहेच.



    सुमित अँटीलने भारताला ऑलिपिंकमध्ये दुसरे सुवर्ण पदक मिळताच देशात आनंदाची लहर पसरली असून आजच्या जन्माष्टमीच्या आनंदाला त्यामुळे बहर आला आहे. सुमितच्या सोनिपत गावात जोरदार जल्लोष चालू झाला आहे. सुमितची आई निर्मला देवी या त्याच्याशी आज सकाळीच फोनवर बोलल्या होत्या. त्यावेळी सुमितने सुवर्ण पदक जिंकण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला होता, असे निर्मला देवी यांनी सांगितले.

    आज सकाळपासून भारताची पदकांची लयलूट सुरूच आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमित अँटील याचे अभिनंदन केले असून त्याने देशाची मान जगात उंचावल्याबद्दल समस्त भारतीयांना अभिमान वाटतो, असे म्हटले आहे.

    तत्पूर्वी, टोकियो पँराऑलिम्पिकमध्ये भारतीय दिव्यांग खेळाडूंनी अतिशय चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट चालू ठेवली. अवनी लेखरा हिने आज सकाळीच एअर पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक मिळवल्यानंतर भारताने आणखीन तीन पदकांची कमाई केली आहे. देवेंद्र झांझरिया याने भालाफेकीत रौप्यपदक मिळवले. त्याच प्रकारात सुंदर सिंग याने ब्रॉंझपदक पटकावले तर थाळीफेकीत योगेश कथूनिया याने रौप्य पदक पटकावले आहे.

    Family members & friends of para javelin thrower Sumit Antil celebrate by dancing in Haryana’s Sonipat

    Related posts

    Bansuri Swaraj : बांसुरी स्वराज यांनी गांधी कुटुंबाला एका खास ‘बॅग’द्वारे केले लक्ष्य

    Zeeshan Siddiqui : झीशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा आल्या जीवे मारण्याच्या धमक्या!

    काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबार; पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून अमित शाहांना दिल्या कठोर कारवाईच्या सूचना!!