• Download App
    अवघ्या सहा तासांत फेसबुकचे तब्बल ४० अब्ज डॉलर्सचे नुकसान|Face Book lose 40 billion dollars in 6 hours

    अवघ्या सहा तासांत फेसबुकचे तब्बल ४० अब्ज डॉलर्सचे नुकसान

     

    वॉशिंग्टन – फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्‌सॲप आणि मेसेंजर या सोशल मीडिया सेवा काल रात्री सुमारे सहा तास खंडित झाल्याने जगभरातील कोट्यवधी युजर्स हवालादिल झाले.Face Book lose 40 billion dollars in 6 hours

    या बंद पडल्याने जागतिक बाजारात विविध कंपन्यांचे १६ कोटी डॉलरचे नुकसान झाले. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना सात अब्ज डॉलरचा फटका बसला, तर फेसबुकचे ४० अब्ज डॉलरचे नुकसान झाले असावे असे तज्ञांचे मत आहे.



    जगातील सर्वांत मोठ्या सोशल मीडिया कंपनीच्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या तीन सेवा एकाच वेळी बंद पडण्याचा हा प्रकार दुर्मीळ मानला जातो. जगभरातील साडे तीन अब्ज लोक फेसबुकचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि व्यवहार करण्यासाठी करतात.

    ‘फेसबुक’च्या मालकीच्या या सर्व सोशल मीडिया सेवा काही काळ बंद पडल्या होत्या. चुकीच्या पद्धतीने कॉन्फिगरेशन बदलले गेल्याने हा प्रकार घडल्याचे ‘फेसबुक’ने सांगितले. या सेवा बंद असण्याच्या काळात ग्राहकांच्या खासगी माहितीशी कोणतीही तडजोड झाली नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले.

    Face Book lose 40 billion dollars in 6 hours

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार